Home /News /auto-and-tech /

Datsun कारवर मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत सूट, जाणून घ्या कधी पर्यंत घेता येणार लाभ

Datsun कारवर मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत सूट, जाणून घ्या कधी पर्यंत घेता येणार लाभ

जपानी वाहन उत्पादक कंपनी डॅटसन इंडियानेही आपल्या विविध कार्सवर घसघशीत सवलत जाहीर केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत मिळणार आहे.

    मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सगळया जगातले व्यवहार ठप्प झाले. अनेक व्यवसाय बंद झाले;अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी बहुतांश लोकांनी खर्च करण्यापेक्षा पैसे वाचववण्यावर भर दिला आहे. त्यामुळे चैनीच्या वस्तू खरेदीत घट झाली आहे. याचा मोठा फटका पर्यटन, हॉटेल आणि वाहन उद्योगाला बसला. 2020 च्या सुरुवातीला कार्सची विक्री कमीच झाली होती, कोविड 19 च्या साथीनंतर ती अधिकच घसरली. या पार्श्वभूमीवर, आता कार्स विक्रीला चालना देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे कार्सच्या किंमतीवर विविध सवलती जाहीर करण्यात येत आहेत. जपानी वाहन उत्पादक कंपनी डॅटसन इंडियानेही आपल्या विविध कार्सवर घसघशीत सवलत जाहीर केली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत मिळणार आहे. कारचे मॉडेल आणि प्रकार यानुसार सवलतीची रक्कम वेगवेगळी आहे. डॅटसनच्या रेडी गो, गो आणि गो प्लस या कार्सवर ही सवलत मिळणार आहे. रोख किमतीतील सवलत, वार्षिक सवलत, एक्सचेंज बोनस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना स्पेशल कार्पोरेट डिस्काउंटस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती आणि काय सवलत आहे ती डॅटसन रेडी गो – हे डॅटसनचे सर्वांत लहान कार मॉडेल आहे. ज्यांना ही कार खरेदी करायची आहे, त्यांना सात हजार रुपये सवलत मिळू शकते. तर एक्सचेंज बेनिफिट 15 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो, तर वर्षअखेर सवलत 11 हजार रुपयांपर्यंत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक असतील तर त्यांना 5 हजार रुपयांची अधिक सवलत मिळू शकते. डॅटसन गो – या कार मॉडेलवर वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कोणतीही अतिरिक्त सवलत नाही;पण ग्राहकांना 20 हजार रुपयांची सवलत रोख आणि एक्स्चेंज डिस्काउंट या दोन्ही पर्यायामध्ये मिळू शकते. त्याशिवाय वर्षअखेर सवलत 11 हजार रुपये मिळू शकते. डॅटसन गो प्लस - डॅटसन गो प्रमाणे या कारवर देखील वर्षअखेर सवलत 11 हजार रुपये मिळू शकते. या कारवर देखील वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कोणतीही अतिरिक्त सवलत नाही. यावर 15 हजार रुपयांची रोख सवलत तर 20 हजार रुपये एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या