मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

CNG आणि हायब्रिडमध्ये काय आहे फरक? कोणती कार खरेदी करण्यासाठी योग्य पर्याय?

CNG आणि हायब्रिडमध्ये काय आहे फरक? कोणती कार खरेदी करण्यासाठी योग्य पर्याय?

पर्यायी पॉवरट्रेनमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतात CNG हा पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून ओळखला जातो.

पर्यायी पॉवरट्रेनमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतात CNG हा पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून ओळखला जातो.

पर्यायी पॉवरट्रेनमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतात CNG हा पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून ओळखला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईमुळे जगभर इतर पर्यायांची मागणी वाढत आहे. पर्यायी पॉवरट्रेनमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतात CNG हा पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून ओळखला जातो. पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त आहे आणि प्रदूषणही कमी करते.

दुसरीकडे, हायब्रीड पॉवरट्रेन तंत्रज्ञानाचा ग्रीन आणि क्लीन पॉवरट्रेन पर्याय म्हणून प्रचार केला जातो. हायब्रीड पॉवरट्रेन तंत्रज्ञानाने नेहमीच्या पेट्रोल-डिझेल कार आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सिस्टीममधील अंतर कमी करणे अपेक्षित आहे. सध्या जगात हायब्रीड कारची मागणीही वाढत आहे. सीएनजी कार आणि हायब्रीड कारमध्ये काय फरक आहे आणि या दोन कारपैकी कोणती कार खरेदी करण्याचा योग्य पर्याय आहे ते येथे जाणून घेऊया.

CNG कारचे फायदे

सीएनजी कार सीएनजी किटसह येतात, जी पेट्रोल इंजिनला जोडलेली असते. या कार सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर धावू शकतात. सीएनजी किट आफ्टरमार्केटमधून इंस्टॉल केले जाऊ शकते किंवा ते OEM द्वारे प्री-इंस्टॉल देखील केले जाऊ शकते. भारतात, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स सीएनजी किटसह अनेक मॉडेल विकतात. या गाड्या साधारणपणे बजेटमध्ये येतात. भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश सीएनजी कारची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

वाचा - OMG! दहावीच्या मुलाने फक्त 3 हजारांत भंगारातून बनवली बाईक! 1 लिटर पेट्रोलमध्ये 120KM प्रवास

सीएनजी कारचे तोटे

सीएनजी कारमध्ये, बूट स्पेसमध्ये वाहनाच्या मागील बाजूस सीएनजी टाकी असते. यामुळे कारच्या बूट स्पेसचा राहत नाही. त्यात जास्त सामान ठेवायला जागा उरत नाही. याशिवाय, अनेक शहरांमध्ये सीएनजी फिलिंग स्टेशन शोधणे देखील मोठे काम आहे. कारण, त्यांची उपलब्धता सध्या खूपच कमी आहे. यासोबतच आता सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये सीएनजी 100 रुपये किलोच्या वर विकला जात आहे.

हायब्रिड इंजिनचे फायदे

हायब्रिड कार अनेक ऊर्जा स्रोत वापरतात. अनेकदा त्यात वीज आणि पेट्रोल-डिझेलचे मिश्रण असते. हायब्रिड कार इलेक्ट्रिक मोटरसह जोडलेल्या अंतर्गत ज्वलन इंजिनसह येतात. हायब्रिड तंत्रज्ञानाचे साधारणपणे तीन प्रकार आहेत. पहिला फुल हायब्रिड, माइल्ड हायब्रिड आणि तिसरा प्लग-इन हायब्रिड आहे. या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना जास्त मायलेज मिळतो. याशिवाय काही कार काही अंतरापर्यंत इलेक्ट्रिक मोडमध्येही चालवता येतात.

हायब्रिड इंजिनचे तोटे

माइल्ड हायब्रिडमध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि कम्बशन इंजिन असते जे एकत्र काम करतात, प्लग-इन हायब्रिड (PHEV), नावाप्रमाणेच, बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करण्यासाठी मेनमध्ये प्लग करणे आवश्यक आहे. PHEV पूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये ऑपरेट केले जाऊ शकते. मात्र, या गाड्यांची किंमत खूप जास्त आहे. तुलनात्मकदृष्ट्या, सध्याच्या काळात हायब्रीड कार खरेदी करणे हा योग्य पर्याय आहे.

First published:

Tags: Electric vehicles, Petrol and diesel price