Home /News /auto-and-tech /

क..ड..क! केवळ रस्त्यावरच नाही तर हवेतही उडणारी कार; भारी म्हणजे परवानगीही मंजूर!

क..ड..क! केवळ रस्त्यावरच नाही तर हवेतही उडणारी कार; भारी म्हणजे परवानगीही मंजूर!

आपण याबद्दल ऐकलं असेल आता तर ती सत्यात अवतरली आहे

    नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : आतापर्यंत उडणाऱ्या गाडीचा आपण केवळ विचारच केला होता. मात्र आता प्रत्यक्षात उडणारी कार तयार करण्यात आली आहे. इतकच नाही तर ही गाडी उडविण्याची परवानगी देखील मिळाली आहे. ही कार PAL (पर्सनल एयर लँड वेहिकल) नावाच्या डच कंपनीने तयार केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, फ्लाइंग कार PAL-V Liberty जगातील पहिली प्रोडक्शन मॉडल फ्लाइंग कार आहे. युरोपच्या रस्त्यावर फ्लाइंग कार युरिपिअन रस्त्यावर कमिशनच्या ट्रायलमध्ये या कारला हिरवा कंदील मिळाला आहे. ज्यानंतर युरोपिअन रोड कमिशनमध्ये लायसेन्स प्लेटसह कार चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्याप या गाडीला हवेत उडविण्याची परवानही मिळाली नाही. कारण यासाठी युरोपिअन एविएशन सेफ्टी एजंन्सीकडून परवानही घ्यावी लागेल. PAL-V कंपनीने दावा केला आहे की हवेत उडण्यासाठी या काला 2022 पर्यंत परवानगी मिळेल. या कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीने 2010 मध्ये याचा प्रोटोटाइप तयार केला होता. आता 2020 मध्ये या गाडीला चालविण्याची परवानगी मिळाली आहे. या कारला मंजुरीपूर्वी कडक सुरक्षा प्रक्रियांमधून जावं लागेल. फेब्रुवारी 2020 पासून या कारचे टेस्ट प्रोग्राम सुरू केले होते. यामध्ये स्पीड, ब्रेक आणि ध्वनी प्रदूषणासारख्या मुद्द्यांवरुन चाचणी करण्यात आली. फ्लाइंग कार आहे की सुपर कार! ही कार दिसायला एकदम सुपर कारसारखी दिसते. PAL-V Liberty एक थ्री व्हीलर कार आहे. याचे दोन फायदे आहेत. पहिलं म्हणजे युरोपमध्ये 4 व्हिलरच्या तुलनेत 3 व्हिलरचा परवाना मिळणं अधिक सोपं असतं आणि दुसरं म्हणजे उडविण्याचा विचार करता याचं वजनही कमी आहे. ही कार रस्त्यावर कमाल 160 किलोमीटर स्पीडने चालू शकते. सोबतच सेकंडमध्ये ही 0-100 किमीचं स्पीड घेऊ शकते. ही फ्लाइंग कार साधारण 1000 फूट रनवेवरुन उड्डाण करू शकते. ही 11480 फूट उंचीपर्यंत उडू शकते. यामध्ये 100 लीटर फ्लू टँक देण्यात आलं आहे. ज्यामध्ये 4.3 तासांपर्यंत हवाई प्रवास करू शकता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Car

    पुढील बातम्या