स्वस्तात कार विकताना कंपन्यांचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ?

स्वस्तात कार विकताना कंपन्यांचा ग्राहकांच्या जीवाशी खेळ?

नियमांचा आधार घेत कंपन्या फायदा घेत आहेत. कॉस्ट कटिंगसाठी कंपन्यांकडून गाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपकरणांबाबत तडजोड केले जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : लाखो रुपयांच्या कारमध्ये अनेकदा कंपन्यांकडून कॉस्ट कटिंगसाठी काही सुविधा कमी दिल्या जातात. अर्थात त्या देताना काही नियमांचे पालन आणि अटींची पूर्तता कंपन्यांना करावी लागते. सर्वसामन्य ग्राहकांना कधी कधी प्रश्न पडतो की इतक्या महागड्या कारमध्ये एकच एअरबॅग का देतात. कंपन्यांकडून फक्त ड्रायव्हरसाठी एअरबॅग दिली जाते. त्याच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठी ही सुविधा घेण्यासाठी काही मॉडेल्सवर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. खरंतर सरकारने कंपन्यांसाठी तयार केलेल्या नियमांमध्ये एक एअरबॅग असलेली कार विकण्यास परवानगी दिली आहे.

सरकारच्या नियमानुसार कारमध्ये एक एअरबॅग बंधनकारक आहे. याच नियमाचा फायदा घेत कंपन्या कारमध्ये दोनऐवजी फक्त ड्रायव्हरसाठी एअरबॅगची सुविधा देतात. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. एक एअरबॅग पुरेशी नाही. दुर्दैवानं अपघात झाला तर अशावेळी चालकासोबत असलेल्या प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते.

रस्ते वाहतूक मंत्रालयानं दोन वर्षांपूर्वी गाड्यांच्या सुरक्षेबद्दल प्रस्ताव सादर केला होता. यात कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅगचा प्रस्ताव होता. मात्र पुढे यात बदल झाला.  कारमध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारख्या स्वस्तातली सेफ्टी फीचर्स कारमध्ये आवश्यक आहेत. मात्र, फ्रंट सीटवरील प्रवाशासाठी एअरबॅग बंधनकारक करण्यात आलं नाही.

वाचा : कार घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण! दीड लाखात Alto तर अडीच लाखात खरेदी करा Swift

व्हेइक टेस्टिंग एजन्सीसाठी आणि इतर सरकारी विभागांसोबत चर्चा केल्यानतंर वाहतूक मंत्रालयानं 29 ऑगस्ट 2017 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. यानुसार 1 एप्रिल 2019 पासून तयार करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये 2017 च्या AIS-145  नुसार अतिरिक्त सुरक्षा उपकरणे आणि तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात आले. यामध्ये ड्रायव्हर एअरबॅग बंधनकारक आहे.

वाचा : Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसारप मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की लवकरच या नियमात सुधारणा कऱण्यात येईल. ड्युअल फ्रंट एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल. सध्या नव्या कार पाहता अशी परिस्थिती आहे की किमान तीन अशा कार असतात ज्यामध्ये फक्त एकच एअरबॅग असते.

वाचा : तुमच्या बजेटमध्ये स्पोर्टी लूकच्या दमदार बाइक, एक लाखांपेक्षा कमी किंमत!

VIDEO: वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राभला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Published by: Suraj Yadav
First published: October 9, 2019, 1:38 PM IST
Tags: car

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading