नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : फेस्टिव्हल सीजनमध्ये देशातील प्रमुख कार निर्माता कंपनी Hyundai नी आपल्या नवीन नेक्स्ट जनरेशन i20 लॉन्च केली आहे. या गाडीची बुकिंगही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 हजार रुपयांमध्ये ही गाडी बुक करता येऊ शकते. ही नेक्स्ट जनरेशन Hyundai i20 च्या एक्स शोरूमची किंमत 6,79,900 रुपये इतकी सुरू आहे.
काय आहेत कारचे स्पेसिफिकेशन
ही कार पेट्रोल, डिजेल आणि टर्बो पेट्रोल BS-VI इंजिन आणि ट्रान्समिशन वर्जनमध्ये मिळेल. ज्यात फर्स्ट-इन-सेगमेंट इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (IMT), इंटेलिजेंट वेरिएबल ट्रान्समिशन (IVT), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (DCT) आणि मॅन्युअल वॅरिएन्ट सामील आहेत. All new i20 पेट्रोल, डिजेल आणि Turbo पेट्रोलमध्ये BSVI इंजिनसोबत मिळेल. यामध्ये तुम्हाला इन्टेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन, इंटेलिजंट वॅरिएबल ट्रान्समिशन, 7 स्पीड ड्यूअल क्लच ट्रान्समिशन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय राहिल.
Hyundai motor चे MD आणि सीईओ एसएस किमनुसार i20 Hyundai साठी एक सुपर परफॉर्मर ब्रँड राहिला आहे. जे एका दशकांहून जास्त वेळापर्यंत आधुनिक भारतीय ग्राहकांना सर्विस देत आहे. पहिल्या बुकिंगमध्ये कॅशबॅक मिळत आहे. clicktobuy.hyundai.co.in प्लॅटफॉर्ममधून ही कार बुक केल्यानंतर HDFC Bank आणि ICICI Bank च्या ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.
6 रंगांमध्ये आहे गाडी
या कारसह 5 वर्षांची Warranty, 3 वर्षांपर्यंत Roadside Assistance, 3 वर्षांपर्यंत ब्लूलिंक सब्सक्रिप्शन मिळेल. Hyundai i20 4 वॅरिएंट Magna, Sportz, Asta आणि Asta (O) मध्ये येईल. i20 6 कलर पोलर व्हाइट, टाइफून सिल्वर, टाइटन ग्रे, फियरी रेड, स्टारी नाइट आणि मॅटेलिक कॉपरमझ्ये उपलब्ध होईल. सोबतच दोन Dual tone color पोलर व्हाइट विद ब्लॅक रूफ आणि फियरी रेड विथ ब्लॅक रूफ मिळेल.