Home /News /auto-and-tech /

Selling old car Tips: तुम्हीही Car विकणार आहात का? मग या गोष्टी आधी जाणून घ्या, नंतर होईल मनस्ताप

Selling old car Tips: तुम्हीही Car विकणार आहात का? मग या गोष्टी आधी जाणून घ्या, नंतर होईल मनस्ताप

गाडी विकण्याच्या घाईत अनेक निष्काळजीपणा करतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कार विकताना जास्त नफा मिळेल आणि नंतर होणारा (Selling an old car Tips) त्रास वाचू शकेल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 03 जानेवारी : तुम्हाला तुमची जुनी कार विकून नवी कार घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, अनेकदा आपण गाडी विकण्याच्या घाईत अनेक निष्काळजीपणा करतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कार विकताना जास्त नफा मिळेल आणि नंतर होणारा (Selling an old car Tips) त्रास वाचू शकेल. तुमच्या कारची किंमत जेव्हाही तुम्ही तुमची वापरलेली कार विकण्याचा विचार कराल, त्याआधी तुम्हाला तिची मार्केट व्हॅल्यू माहीत असणे आवश्यक आहे. कारण, अनेक वेळा तुमच्या कारची नेमकी किंमत समजत नसल्याने तिच्या विक्रीची किंमत किती सांगावी याबद्दल गोंधळ होतो. म्हणून, कार विकण्यापूर्वी तिची मार्केट व्हॅल्यू (Car Market Value) तपासून पहा. कार विकण्यापूर्वी काही किरकोळ कामे करा तुमची कार विकण्यापूर्वी तुम्ही तिची किरकोळ कामे करून घेणे गरजेचे आहे. कारण अनेकदा या किरकोळ समस्यांमुळे तुम्हाला कारच्या टेस्टिंगदरम्यान अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाहनाची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे, जेव्हाही तुम्ही कार विकण्याचा विचार कराल तेव्हा त्यातील किरकोळ कामे करून घ्यावीत. कार विकण्यापूर्वी पेपर वर्क पूर्ण करा कारची विक्री करण्यापूर्वी, तुम्ही कारच्या नवीन मालकाला सर्व थकबाकीची माहिती द्यावी. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयातून एनओसी घ्यावी लागेल. ज्यामध्ये कार मालकावर कोणताही कर किंवा दंड भरावा लागणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले असते. त्याच वेळी, तुम्ही प्रदूषण प्रमाणपत्र आणि कारचा सर्व्हिस हिस्ट्री नवीन मालकाला सांगितली पाहिजे. हे वाचा - सुकून गेलीत का तुमची महागडी मेकअप प्रोडक्ट्स? फेकून देण्यापूर्वी हे सोपे उपाय करून पुन्हा वापरा कारची सर्व आवश्यक कागदपत्रे हस्तांतरित करणे कार विकण्यापूर्वी तुम्हाला कारची सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की, आरसी आणि विमा पॉलिसी नवीन मालकाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ही कागदपत्रे हस्तांतरित केली नाहीत तर भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि विकत घेणाऱ्यालाही. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात कार विक्री करण्याचा उत्तम उपाय तुम्ही तुमची कार दोन प्रकारे विकू शकता. ज्यामध्ये तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतींचा अवलंब करू शकता. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कार विकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऑनलाइन माध्यमातून. यामध्ये तुम्हाला जास्त कटकटी सहन कराव्या लागत नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Business News, Car

    पुढील बातम्या