Home /News /auto-and-tech /

iPhone 12 खिशाला परवडत नाही? तर हे 5 फोन देतील तोच Experience; म्हणून वाचाच!

iPhone 12 खिशाला परवडत नाही? तर हे 5 फोन देतील तोच Experience; म्हणून वाचाच!

Apple iphone भारी असला तरी हे फोनही त्याच्या तोडीत तोड आहेत.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : ॲपलचा आयफोन 12 बाजारात दाखल झाला आहे. आयफोन 11 च्या तुलनेत हा नवा फोन अधिक आकर्षक आहे. 5G कनेक्टिव्हिटी, ड्युएल कॅमेरा (प्रो मॉडेलमध्ये तीन कॅमेरा), शक्तिशाली प्रोसेसर आणि आयफोन 11 हून बारीक आणि वजनाला हलकं डिझाइन ही आयफोन 12 ची काही महत्त्वाची वैशिष्ट्यं. पण वास्तवात डिस्काउंट मिळाली तरीही प्रत्येकालाच 52 हजार रुपयांहून (आयफोन मिनीची किंमत 51 हजारांपासून सुरू होते.) महाग आयफोन खरेदी करणं परवडत नाही. सध्या कोरोनाची महामारी आणि आर्थिक मंदीचा फटका बसलेल्या ग्राहकांना फोन अपग्रेड करायचाच असेल तर आयफोन आणि काही इतर फोनची 5G मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत जी तुमच्या खिशाचीही काळजी घेतील. त्यावर नजर टाकूया. Google Pixel 4a 5G 5G नेटवर्क अजून सगळीकडे पोहोचलेलं नाही त्यामुळे तसा फोन घेण्याची अनेकांची इच्छा असली तरीही त्याचा फारसा उपयोग होणार नाही. पण ज्या मोठ्या शहरांत हे नेटवर्क उपलब्ध आहे त्यांच्यासाठी Google Pixel 4a 5G हा फोन चांगला पर्याय आहे. याची किंमत साधारण 36 हजार 427 रुपयांपासून सुरू होते. या किमतीमुळे गुगल महागड्या फोनच्या शर्यतीतून थोडासा बाहेर पडतो. या महिन्याच्या सुरुवातीला गुगलनी या श्रेणीतील फोन बाजारात आणल्यावर गुगल कंपनी महागड्या फोनच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. याच वर्षी गुगलनी सादर केलेल्या पिक्सल 4a या फोनमध्ये 5G  नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी नवं मॉडेल आणलं आहे. तसं हे स्वस्तातलं 4a मॉडेल सुमारे 25 हजार 477 रुपयांना मिळतं. तोही चांगला पर्याय आहे. Google Pixel 4a 5G मध्ये डिस्प्लेचं रिझॉल्युशन कमी आहे, प्रोसेसर कमी क्षमतेचा आहे आणि तो वॉटरप्रूफही नाही. पण यात 6.2 इंचांची स्क्रीन, अद्ययावत कॅमेरा, 128GB स्टोरेज, अँड्रॉइट ओएस तसंच इतर 5G फोनच्या तुलनेत कमी किमतीत 5G  सेवा या फोनमध्ये उपलब्ध आहे. नोव्हेंबरमध्ये हा फोन लाँच होत आहे. Motorola One 5G 5G कनेक्टिव्हिटीसोबत या फोनमध्ये 6.7-इंचाची full-HD स्क्रीन, चार रिअर कॅमेरा आणि 128 GB built-in स्टोरेज मिळणार आहे.याची बॅटरी क्षमता 5,000 mAh battery (iPhone 12 च्या क्षमतेपेक्षा दुप्पट, आणि 5G साठी मोठी बॅटरी क्षमता उपयोगी ठरणार आहे). काचेऐवजी प्लॅस्टिकची बॉडी आणि केवळ 4GB एवढी RAM हे दोन कच्चे दुवे आहेत. Motorola One 5G ची किंमत अंदाजे 32 हजार 485 रुपयांपासून सुरू होत आहे. सध्या बाजारात उपलब्ध इतर 5G स्मार्टफोनच्या तुलनेत सर्वांत हलका आहे. Samsung Galaxy A51 5G सॅमसंगनी स्वस्त फोनमध्ये उच्च दर्जाचं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलंय ही चांगली बाब आहे. आणि गॅलेक्सी ए सीरीजमधील फोन या वर्षी बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. A51 5G मध्ये full-HD 6.5-इंचांचा डिस्प्ले, मागच्या बाजूला चार कॅमेरा, इन स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर आणि दीर्घकाल चालणारी बॅटरी ही वैशिष्ट्य आहेत. या वेगवान प्रोसेसर नाहीए पण अंदाजे 36 हजार 427 रुपयांमध्ये तुम्हाला महागड्या फोनमध्येही नसणारी अनेक फीचर्स वापरायला मिळतील. जर तुम्हाला आयफोनच हवा असेल तरीही काळजी करू नका एक पर्याय आहे. हे ही वाचा-20 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय iPhone; Flipkart वर धमाकेदार ऑफर आयफोन SE किमतीबाबत जागरुक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अपलनी या वर्षी आयफोन SE लाँच केला. याची किंमत साधारणपणे 29 हजार 127 रुपयांपासून सुरू होते पण त्याची क्षमता महागड्या आयफोन 11 इतकीच आहे. यामध्ये 4.7 इंचांचा डिस्प्ले, होम बटण, टच आयडी अशी फीचर्स आहेत जी नव्या आयफोनमध्ये नाहीत. अपलच्या नव्या मॉडेलमध्ये तुम्हाला मागच्या बाजूला दोन किंवा तीन कॅमेरा दिसतील SE  ला मागच्या बाजूला केवळ एखच कॅमेरा लेन्स आहे पण या वर्षी सगळ्यांचाच बराचसा वेळ घरातच गेला आहे त्यामुळे अनेक कॅमेऱ्यांचा फोन काय कामाचा? अपलनी आयफोन X (अंदाजे 36 हजार 427 रुपये) आणि 11 (अंदाजे  43 हजार 427 रुपये) या मॉडेलसच्या किमतीही कमी केल्या आहेत. तुम्हाला साधाच पण चांगलं काम करणारा फोन हवा असेल तर... विश्वासार्ह, फोन करता येण्याजोगा, मेल तपासता येण्याजोगा आणि चांगली बॅटरी असणारा फोन हवा असेल तर Moto G Power हा चांगला पर्याय आहे. यात 5,000 mAh बॅटरी, एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 16 तास चालते (6.4-इंचांची स्क्रीन आणि जड बॅटरीमुळे हा फोन थोडा वजनाला जड होतो.) डिस्प्ले, 3 रिअर कॅमेरा याबाबत महागड्या फोनशी हा बरोबरी करतो. Moto G Powerची किंमत अंदाजे 21 हजार 827 रुपये असून सध्या कंपनीच्या वेबसाइटवर त्याची किंमत अंदाजे 14 हजार 527 रुपये दाखवत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Iphone

    पुढील बातम्या