• Home
  • »
  • News
  • »
  • auto-and-tech
  • »
  • सेकंड हँड गाडी घेताय? मग या गोष्टी पाहाचं, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

सेकंड हँड गाडी घेताय? मग या गोष्टी पाहाचं, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

कित्येक वेळा सेकंड हँड गाडीचा सौदा फायद्याचा ठरत असला, तरी काही वेळा मात्र यात गाडी घेणाऱ्याचे नुकसान होते.

  • Share this:
मुंबई, 3 ऑगस्ट- स्वतःच्या मालकीची एक चारचाकी गाडी असावी, असं बहुतांश लोकांचं स्वप्न असतं. बऱ्याच वेळा गाड्यांची किंमत परवडत नसल्यामुळे, लोक सेकंड हँड गाडीचा (Second hand Car) पर्याय अवलंबतात. यामुळे गाडीचे चांगले मॉडेलही कमी किमतीमध्ये मिळून जाते. कित्येक वेळा हा सौदा फायद्याचा ठरत असला, तरी काही वेळा मात्र यात गाडी घेणाऱ्याचे नुकसान होते. सेकंड हँड गाडी घेताना जर तुम्ही निष्काळजीपणा (Precaution while buying second hand car) दाखवला, तर तुम्हालाही नुकसान सोसावं लागेल. असं होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स (car buying tips) देणार आहोत. या गोष्टी पाळाल, तर सेकंड हँड कारही अगदी नव्या गाडीप्रमाणे मिळवू शकाल. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेकंड हँड गाडी घेताना सर्वात आधी एखाद्या मेकॅनिकला दाखवून, त्या गाडीची कंडिशन तपासावी. यामुळे गाडी किती चांगली आहे हे तर लक्षात येईलच, त्यासोबतच गाडीसाठी तुम्ही देत असलेली रक्कम योग्य आहे का हेदेखील लक्षात येण्यास मदत होईल. गाडीच्या आतील आणि बाहेरील भाग तपासून घेणं (Check interior of car) गरजेचं आहे. गाडीला कुठे डेंट आहे का, इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, अशा गोष्टी मेकॅनिक तुम्हाला सांगू शकेल. यासोबतच, गाडीचे टायर तपासून घेणं आवश्यक आहे. तसेच, कागदपत्रांमध्ये दिलेला गाडीचा चॅसीचा नंबर (Chassis Number) आणि गाडीमधील चॅसीचा नंबर एकच आहे का याची खात्री करुन घेणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला पुढे कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. (हे वाचा: Bike वर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम, असा करावा लागणार टू-व्हिलरवर प्रवास) गाडीच्या इन्शुरन्सबाबत (Car insurance) माहिती घेणेही गरजेचे आहे. सेकंड हँड गाडी विकत घेतल्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जुन्या मालकाच्या जागी आपलं नाव नोंदवणं (Car insurance transfer) आवश्यक आहे. गाडी विकत घेताना असं लक्षात आलं, की तिचा इन्शुरन्स केलेला नाही, तर तातडीने इन्शुरन्ससाठी नोंदणी करुन घ्यावी. यासोबतच, गाडीची कागदपत्रं आपल्या नावावर करण्यापूर्वी व्हेईकल हिस्ट्री (Vehicle history) तपासून घ्यावी. गाडीचा यापूर्वी कधी अपघात झाला आहे का, असल्यास तो कशा प्रकारचा होता या सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. यात काही विवादास्पद माहिती आढळून आल्यास अशी गाडी घेणं टाळावं. (हे वाचा: Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम) सेकंड हँड गाडीमधील हेड लाईट, टेल लाईट, इंडिकेटर्स, एसी अशा छोट्या छोट्या गोष्टीही तपासून घ्याव्यात. या गोष्टी दिसायला छोट्या असल्या, तरी यांच्या दुरुस्तीचा (Car repairing) खर्च हजारांच्या घरात जातो. त्यामुळे पुढे होणारे नुकसान टाळण्यासाठी आधीच या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. अशा काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही सेकंड हँड गाडी घेतली, तर तुमचे पैसेही वाचतील आणि नव्या गाडीप्रमाणेच चांगली गाडी तुम्हाला मिळू शकेल.
First published: