मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताय? गैरसोय टाळण्यासाठी लक्षात ठेवा `या` गोष्टी

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताय? गैरसोय टाळण्यासाठी लक्षात ठेवा `या` गोष्टी

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताय? गैरसोय टाळण्यासाठी लक्षात ठेवा `या` गोष्टी

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताय? गैरसोय टाळण्यासाठी लक्षात ठेवा `या` गोष्टी

इंधन दरवाढीमुळे तुम्हीदेखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या स्कूटर सातत्याने लॉंच होत आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर सातत्यानं वाढत आहेत. इंधनाचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने सहाजिक सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच प्रदूषण वाढल्याने अन्य समस्यादेखील निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांचा इलेक्ट्रिक वाहन वापराकडे कल वाढू लागला आहे. सरकारदेखील इलेक्ट्रिक वाहनं वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. इंधन दरवाढीमुळे तुम्हीदेखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या स्कूटर सातत्याने लॉंच होत आहेत. अशा स्थितीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. ईव्ही खरेदी करण्यापूर्वी मनातील शंकांचे निरसन होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा उद्देश निश्चित करा. तुम्हाला या स्कूटरचा वापर व्यावसायिक कारणासाठी करायचा आहे की वैयक्तिक वापरासाठी, हे स्पष्ट असू द्या. व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-स्कूटरमध्ये स्टोरेज स्पेस आणि तिच्या वहन क्षमतेला प्राधान्य दिलं जातं. या मॉडेल्सचा वापर वस्तुंच्या डिलिव्हरीसाठी केला जातो. व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ई-स्कूटरमध्ये फीचर कमी असतात. तसंच त्यांचा वेगही कमी असतो. हिरो इलेक्ट्रिक, जितेंद्र ईव्ही आणि ओकिनावा सारख्या काही कंपन्या व्यावसायिक वापरासाठीच्या ई-स्कूटर लॉंच करतात.

वैयक्तिक वापरासाठीच्या ई-स्कूटर आणि बाईक हाय आणि लो स्पीड फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. लो स्पीडच्या ई-स्कूटर तुलनेने स्वस्त असतात. शहरात जवळ अंतरावर प्रवास करण्यासाठी या स्कूटर उपयुक्त मानल्या जातात. या स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसते. हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर प्रीमिअम श्रेणीत उपलब्ध आहेत. यात एथर 450X,बजाज चेतक, रिव्होल्ट आरव्ही 400, टीव्हीएस आयक्यूब आणि ओला एस 1 यांचा समावेश आहे. यामध्ये उत्तम फीचर्स, स्टोरेज कपॅसिटी, डिझाईन चांगले फिनिश्ड असते.

हेही वाचा:‘या’ परवडणाऱ्या SUVची भारतात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी 1 लाखांहून अधिक ग्राहक रांगेत

पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक व्हेईकल सर्व्हिसिंग करण्याची प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. या सेगमेंटमधील बहुतांश कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री ऑनलाइन करतात. तसेच सर्व्हिसिंग साठी मोबाईल नेटवर्कसारख्या तंत्रावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे अशी स्कूटर खरेदी करताना सर्व्हिसिंगबाबत ग्राहकांनी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला किती स्पीड आणि रेंजची गाडी खरेदी करायची आहे, हे निश्चित करा. जर तुमची रेंज कमी असेल तर तुम्ही 25 किमी/प्रतितास वेग असलेली स्कूटर निवडू शकता. ज्या शहरांमध्ये फ्लायओव्हरची संख्या अधिक आहे, अशा शहरांतील लोकांसाठी ही स्कूटर योग्य पर्याय नाही. जर तुम्ही रोज 80 किलोमीटर प्रवास करत असाल तर तुम्ही हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी.

आजकाल इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांमध्ये स्वॅपेबल, रिमूव्हेबल आणि फिक्स्ड बॅटरीचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. स्वॅपेबल बॅटरी देणारे ब्रॅंडस सुरूवातीच्या टप्प्यात काही निवडक शहरांमध्येच बॅटरी स्वॅपिंग सुविधा उपलब्ध करून देत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला रायडर सबस्क्रिप्शनच्या आधारे तुमच्या डिस्चार्ज बॅटरीच्या बदल्यात चार्ज केलेली बॅटरी मिळू शकते, यासाठी तुम्हाला नाममात्र रक्कम खर्च करावी लागते. स्कूटरमधील रिमूव्हेबल बॅटरी काढून ती तुम्ही घर, ऑफिस किंवा एखाद्या पार्किंगमधील चार्जिंग स्पॉटवर नेऊन चार्ज करू शकता. बॅटरी चार्जिंगसाठी एक चांगली पार्किंग स्पेस किंवा चार्जिंग स्टेशन हे उत्तम ठिकाण ठरू शकतं.

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी राज्य सरकार अनेक अनुदान योजना राबवत आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यावर तुम्हाला FAME II अनुदानाचा लाभ मिळतो. यामुळे स्कूटरच्या किंमतीत खूप फरक पडतो. मात्र हे अनुदान मार्च 2024 पर्यंत केवळ 10 लाख दुचाकींवर दिले जाणार आहे. FAME II अनुदानाची मुदत संपल्यावर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढणार आहेत.

First published:

Tags: Bike, Electric vehicles