नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: सध्याच्या महागाईच्या काळात सामान्य माणूस छोट्या-छोट्या गोष्टींमधून बचत करण्याचा प्रयत्न करतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) वाढत्या किंमतीमुळे भारतात हरित ऊर्जा आणि पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची (Buy Electric Bike) मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुचाकींनाही अधिक प्राधान्य दिलं जात आहे.
मेंटेनन्स करण्यासाठी सहज आणि सुलभ ड्रायव्हिंगमुळे, भारतीय मध्यम वर्ग इलेक्ट्रिक दुचाकींना इंटरसिटी मोबिलिटीसाठी सर्वोत्तम पर्याय मानत आहे. जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सविषयी (Two Wheelers under 50000 rupees) सांगणार आहोत. या टू-व्हीलर्स उत्तम ड्रायव्हिंग रेंजसह सामान्यांच्या बजेटमध्ये येतात. जाणून घ्या या इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल...
कबीरा मोबिलिटी (Kabira Mobility)
कबीरा मोबिलिटीची कोलेजिओ (Kollegio) इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एकाच चार्जवर 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त 45,990 रुपये आहे.
हे वाचा-8 लाखांची कार Loanवर घेतली तर भरावे लागतील 10.47लाख; समजून घ्या व्याज दराचं गणित
रफ्तार इलेक्ट्रीका (Raftaar Electrica)
Raftaar Electrica देखील अशीच एक दुचाकी बाईक ऑफर करत आहे, जी तुम्हाला एका चार्ज मध्ये 100 किमीची रेंज देते. या बाईकची किंमत 48,540 रुपये आहे. यात 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते आणि त्याची टॉप स्पीड 25 किमी/ताशी असते.
Komaki XGT KM
Komaki ची ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील या यादीत आहे. ही स्कूटर तुम्हाला एका चार्जमध्ये 85 किमीची रेंज देईल. या स्कूटरसाठी तुम्हाला फक्त 42,500 रुपये मोजावे लागतील.
वेलेव मोटर्स व्हीईव्ही 01 (Velev Motors VEV 01)
ही स्कूटर या श्रेणीतील सर्वात कमी किंमतीची आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एकाच चार्जवर 70 ते 80 किलोमीटरची रेंज देईल. या बाईकची किंमत फक्त 32,500 रुपये आहे.
यो एज (Yo Edge)
यो एजची इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला एकाच चार्जवर 80 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. या बाईकची किंमत 49,000 रुपये आहे.
हे वाचा-सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ऑक्टोबरपासून वाढणार CNG-PNG च्या किंमती?
कोमाकी झोन (Komaki Xone)
कोमाकीची आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. कोमाकी झोन तुम्हाला एका चार्जमध्ये 85 किमी ड्रायव्हिंग रेंज देते आणि या स्कूटरची किंमत 45,000 रुपये आहे.
Komaki X2 Vouge
Komaki X2 Vouge इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला एका चार्जमध्ये 85 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 47,000 रुपये आहे.
अँपिअर मॅग्नस प्रो (Ampere Magnus Pro)
ही इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला एकाच चार्जवर 75 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल. या स्कूटरची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होत आहे.
हे वाचा-दिवाळीआधी घरी आणा Mahindra XUV300,मिळेल 44 हजारांचा बेनिफिट आणि स्वस्त EMI ऑप्शन
गेलिओस होप (Geliose Hope)
ही इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला एका चार्जमध्ये 75 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल. या बाईकची किंमत 46,999 रुपये आहे.
बेनलिंग फाल्कन (Benling Falcon)
ही इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला 48,150 रूपयांत खरेदी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news