Home /News /auto-and-tech /

Honda Activa ची जबरदस्त ऑफर; डाउन पेमेंट शिवाय खरेदी करा स्कूटर, कॅशबॅकही मिळणार

Honda Activa ची जबरदस्त ऑफर; डाउन पेमेंट शिवाय खरेदी करा स्कूटर, कॅशबॅकही मिळणार

जर तुम्हालाही होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Honda Activa वर कंपनी कॅशबॅक देत आहे.

  नवी दिल्ली, 25 जून : Honda Activa देशातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. जर तुम्हालाही होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Honda Activa वर कंपनी कॅशबॅक देत आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट कंपनी (Honda Motorcycle & Scooter India Private Company) 30 जूनपर्यंत Honda Activa 125 च्या बुकिंगवर कॅशबॅक ऑफर देत आहे. ग्राहकांना कॅशबॅक रुपात 3500 रुपये मिळतील. या ऑफरशिवाय इतर काही सुविधाही देण्यात येणार आहेत.

  (वाचा - दुचाकीत वारंवार बिघाड होतो? मग फॉलो करा या टिप्स आणि पैशांची करा बचत)

  Honda Activa 125 वर 3500 कॅशबॅक मिळवण्यासाठी काही अटी आहेत. यासाठी SBI च्या क्रेडिट कार्डवरुन बुकिंग करावं लागेल. SBI Card द्वारे स्कूटर बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळते आहे. SBI Card ने EMI वर स्कूटर खरेदी केल्यास ही ऑफर लागू होईल. या ऑफरची महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांना डाउन पेमेंट न करता ही स्कूटर खरेदी करता येईल. तसंच 3500 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल. यात कोणत्याही डॉक्युमेंट्सची गरज पडणार नाही.

  (वाचा -Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक)

  125 CC इंजिन, 4 स्ट्रोक, फॅन कूल्ड SI इंजिन, 8.18 PS मॅक्सिमम पॉवर, 10.3Nm पीक टॉर्क, अ‍ॅटोमेटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission) अर्थात ऑटो गियर, 5.3 लीटर फ्यूल टँक असे फीचर्स Honda Activa 125 मिळतात. दरम्यान, हीरो मोटोकार्प बाईक (Hero MotoCorp) आणि स्कूटर खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल. कंपनीने 1 जुलैपासून आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत 3000 रुपयांपर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इनपुट खर्चात वाढ आणि वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हीरो बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर या महिन्यातच बुक करणं फायद्याचं ठरेल.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या