Home /News /auto-and-tech /

Ola Electric Scooter ची बुकींग सुरू, केवळ 500 रुपयांत मिळतील हे फायदे

Ola Electric Scooter ची बुकींग सुरू, केवळ 500 रुपयांत मिळतील हे फायदे

ओलाचा असा दावा आहे, की Ola Scooter केवळ अठरा मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यात तुम्ही 75 किमीपर्यंत प्रवास करू शकता.

    नवी दिल्ली 16 जुलै : Ola ने आपल्या इलेक्ट्रिक ओला स्कूटरचं बुकिंग (Ola Scooter Booking) सुरू केलं आहे. ही स्कूटर बुक करण्यासाठी ग्राहकांना केवळ एक 'हिरवे पान' म्हणजेच 500 रुपये (Ola Electric Scooter Price) द्यावे लागतील. Ola Scooter कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 499 रुपयांत बुक करता येईल. ही रक्कमही पूर्णपणे रिफंडेबल असेल. जे लोक लवकर बुकींग करतील त्यांना डिलिव्हरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. Ola Scooter तमिळनाडूमध्ये बनत असलेल्या Futurefactory मध्ये तयार होईल. कंपनीची ही फॅक्ट्री जगातील सर्वाधिक मोठ्या इलेक्ट्रिक 2 व्हिलर फॅक्ट्रीमधील एक आहे. याची क्षमता दरवर्षी 1 कोटी दुचाकी बनवण्याची आहे. पहिल्या टप्प्यात या फॅक्ट्रीमध्ये दरवर्षी 20 लाख इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Bike) तयार होतील. ओलाचा असा दावा आहे, की Ola Scooter केवळ अठरा मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते (Ola Electric Scooter Features). यात तुम्ही 75 किमीपर्यंत प्रवास करू शकता. तर, सिंग फुल चार्ज केल्यास ही गाडी 150 किमीपर्यंत चालते. काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर, पॉवर बँकची गरजच नाही आतापर्यंत बाजारात जितक्या स्कूटर आल्या त्याच्या डिक्कीमध्ये केवळ एक हेल्मेट मिळतं. अशात मागे बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःच वेगळं हेलमेट वागवावं लागतं. मात्र, ओला स्कूटरच्या डिक्कीमध्ये 2 हाफ हेलमेट सहज येतील. ओलाचे ना पैसे ना स्मार्टकार्डची गरज; आता तुमच्या नखांनीच करा मनसोक्त शॉपिंग अलीकडेच ओलाचे चेअरमन आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल बंगळुरूच्या रस्त्यावर ओला स्कूटर चालवताना दिसले. कंपनी या महिन्याच्या अखेरपर्यंत ही स्कूटर बाजारात लाँच करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीची योजना भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याची आहे. भारतातूनच यूरोप, ब्रिटन, लॅटिन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह सर्व देशांमध्ये आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर पाठवण्याचा कंपनीचा विचाप आहे. सध्या कंपनीच्या फॅक्ट्रीमध्ये 5 हजारहून अधिक रोबोट दिवसरात्र स्कूटर बनवण्याचं काम करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bike riding, Electric vehicles, Scooter ride

    पुढील बातम्या