मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

BoAt कंपनीचे नवीन इयरबड्स लॉंच; 50 तास चालणाऱ्या बॅटरीसह आहेत अनेक खास फिचर्स

BoAt कंपनीचे नवीन इयरबड्स लॉंच; 50 तास चालणाऱ्या बॅटरीसह आहेत अनेक खास फिचर्स

इअर फोन्स

इअर फोन्स

युझर्सना या बड्समध्ये सर्वोत्तम आवाज, गुणवत्ता, चांगलं कॉलिंग आणि दीर्घ काळ टिकणारी बॅटरी मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 नोव्हेंबर:   बोट (BoAt) कंपनीने नवीन TWS ब्लूटूथ इयरबड एअरपॉड्स 100 हे मॉडेल लॉंच केलं आहे. कंपनीने हे इयरबड्स 1299 रुपये किमतीत उपलब्ध केले आहेत. ग्राहक हे इयरबड्स फ्लिपकार्ट किंवा बोटच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकतात. या इयरबड्समध्ये अनेक अ‍ॅडव्हान्स्ड फीचर्स आहेत. यात ENX, Beast, IWP आणि ASAP आदींचा समावेश आहे. युझर्सना या बड्समध्ये सर्वोत्तम आवाज, गुणवत्ता, चांगलं कॉलिंग आणि दीर्घ काळ टिकणारी बॅटरी मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

हे इयरबड्स ग्राहकांना सफायर ब्लू, ओपल ब्लॅक आणि एमेराल्ड ग्रीन या कलर्समध्ये खरेदी करता येणार आहेत. या इयरबड्सचं डिझाइन बोट एअरडॉप्स कॉम्पॅक्ट प्रकारचं असून, ते कानात सहजतेनं बसतात. या इयरबड्समध्ये IPX4 वॉटर आणि स्वेट रेझिस्टन्स फीचर आहे. बोट कंपनीच्या या इयरबड्समध्ये बोट एअरडॉप्स 100 ब्लूटूथचं 5.2 व्हर्जन देण्यात आलं आहे. यामुळे ऑडिओ आणि कनेक्टिव्हिटी दर्जेदार मिळू शकणार आहे. यात Wake N Paid अर्थात आयडब्लूपी टेक्नॉलॉजी आहे. यामुळे बड्सना पॉवर मिळते आणि ते सहजतेने मोबाइलशी जोडले जाऊ शकतात. TWS इयरबड्समध्ये Beast मोड देण्यात आला आहे. या मोडमध्ये 50 एमएस अल्ट्रा लो-लेटन्सी आहे. यामुळे गेमिंग अगदी सहजतेनं होतं आणि मीटिंग सेशन्सदेखील अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतात.

हेही वाचा -  सावधान! तुमचाही पासवर्ड होऊ शकतो सहजासहजी हॅक, जाणून घ्या त्या मागील कारण

बोट एअरडॉप्समध्ये 10mmचा मोठा डायनॅमिक ड्रायव्हर आहे. तो डीप बाससह ऑडिओ तयार करण्यास मदत करतो. या डिव्हाइसमध्ये ENx तंत्रासह क्वाड मायक्रोफोनही देण्यात आले आहेत. यामुळे युझर्सना कॉलिंग करताना हँड्स फ्री एक्सपिरियन्सचा आनंद मिळू शकतो.

बोट एअरडॉप्सचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात टच कंट्रोल देण्यात आला आहे. या एका बटणाचा वापर करून युझर्स म्युझिक ट्रॅक बदलणं, व्हॉल्युम अ‍ॅडजस्ट करणं किंवा कॉलला उत्तर देणं आदी कामं करू शकतात. हे इयरबड्स सिरी आणि गुगल असिस्टंटलाही जोडता येतात. बोट 50 मध्ये 50 तास लाइफ असलेली बॅटरी देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसंच यात ASAP चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. यामुळे हे इयरबड्स वेगानं चार्ज होऊ शकतात. नवीन इयरबड्स खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर बोट कंपनीचे हे नवीन आणि खास फीचर्स असलेले इयबड्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय नक्कीच ठरू शकतात.

First published:

Tags: Tech news, Technology