मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

सर्वात महागडी स्कूटर BMW C 400 GT भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

सर्वात महागडी स्कूटर BMW C 400 GT भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स

12 ऑक्टोबर रोजी कंपनीने BMW maxi scooter C400GT भारतात लाँच केली आहे. BMW C 400 GT मॅक्सी स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर आहे.

12 ऑक्टोबर रोजी कंपनीने BMW maxi scooter C400GT भारतात लाँच केली आहे. BMW C 400 GT मॅक्सी स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर आहे.

12 ऑक्टोबर रोजी कंपनीने BMW maxi scooter C400GT भारतात लाँच केली आहे. BMW C 400 GT मॅक्सी स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : जर्मनीतील लग्जरी कार निर्माता कंपनी BMW Motorrad India आपल्या नव्या स्कूटरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी Motorrad India ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर BMW Maxi-Scooter चा एक टीजर जारी केला होता. 12 ऑक्टोबर रोजी कंपनीने BMW maxi scooter C400GT भारतात लाँच केली आहे. BMW C 400 GT मॅक्सी स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर आहे.

कंपनीने अधिकृत अकाउंटवर स्कूटरचा टीजर शेअर करत याबाबत माहिती दिली. ही भारतातील सर्वात प्रीमियम ग्रेड स्कूटर ठरली आहे. BMW स्कूटर त्याच्या किंमतीमुळेही सध्या चर्चेत आहे. भारतात या स्कूटरहून अतिशय कमी किंमतीत अनेक प्रकारच्या, विविध फीचर्स असलेल्या स्कूटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या महागड्या स्कूटरला आता भारतीय बाजारामध्ये कसा रिस्पॉन्स मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कंपनीने BMW Motorrad India च्या सर्व डिलरशिपवर नव्या स्कूटरचं बुकिंग सुरू केलं आहे. ही स्कूटर 9.95 लाख रुपये (एक्स शोरूम) किंमतीत लाँच करण्यात आली. BMW C 400 GT स्कूटर दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात एल्पाइन व्हाइट आणि स्टाइल ट्रिपल ब्लॅक कलर आहे. BMW स्कूटरचा टॉप स्पीड 139 kmph असून ही स्कूटर 9.5 सेकंदात 0-100kmph स्पीडने जाऊ शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

BMW C 400 GT मध्ये एक नवं 350 cc वाटर-कूल्ड सिंगल-सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7500 rpm वर 34bhp (25 किलोवॅट) पीक आउटपुट आणि 5750Nm वर 35Nm टॉर्क जनरेट करतं. तसंच स्कूटरला फुल LED हेडलँप्स, मोठी विंडशिल्ड, अपस्वेप्ट एग्जॉस्ट आणि अतिशय मोठं अंडर सीट स्टोरेजही देण्यात आलं आहे.

या स्कूटरमध्ये त्याच्या ब्रेकवर काम करण्यात आलं आहे, ज्यामुळे चालक आरामदायी राइडचा अनुभव घेऊ शकेल. त्याशिवाय स्कूटरच्या CVT गियरबॉक्सलाही अपडेट करण्यात आलं आहे. आता भारतीय मार्केटमध्ये याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:

Tags: Scooter ride