Home /News /auto-and-tech /

Flipkart वर सुरू Big Saving Days Sale, फोन-गॅजेट्सवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट

Flipkart वर सुरू Big Saving Days Sale, फोन-गॅजेट्सवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट

या सेलमध्ये ग्राहकांना 50 नाही तर चक्क 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये या सेलची जोरदार चर्चा सुरू आहे.

    नवी दिल्ली, 13 जून : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) प्लस मेंबर्ससाठी बिग सेविंग डेज सेलची (Big Saving Days Sale) सुरुवात झाली आहे. हा खास सेल लेटेस्ट मोबाइल फोन, स्मार्ट टीवी, एसी, लॅपटॉप, वेअरेबल्स सह अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरही मोठी सूट आणि ऑफर्स दिले जात आहे. 16 जूनपर्यंत असेल सेल फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बिग सेव्हन डेज 13 जूनपासून सुरू झाला आहे आणि 16 जून रोजी मध्यरात्री 12 पर्यंत राहील. परंतु फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांसाठी याची सुरुवात 12 जूनपासून झाली आहे. या दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) खातेधारकांना कार्ड पेमेंटवरील इतर ऑफर्ससह अतिरिक्त 10% त्वरित सूट मिळेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80% पर्यंत सूट बिग सेविंग डेज सेलमध्ये स्मार्टफोन्स व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि एक्सेसरीजच्या खरेदीवर 80% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉच (Smartwatch) वर 60 टक्क्यांपर्यंत सूट, टॅबलेटवर (Tablets) 50 टक्क्यांपर्यंत सूट आणि डेस्कटॉप पीसी आणि Laptop वर 30 टक्क्यांपर्यंत सूट असेल. या सेलमध्ये टीवीवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. iPhone सह या फोनवरही जबरदस्त डिस्काउंट हे ही वाचा-Facebook आणि Instagram वरून करा बक्कळ कमाई, पाहा नवीन फिचर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Motorola, Google, Apple, Samsung आणि Asus, Realme, POCO सारख्या ब्रँडवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. या सेलदरम्यान तुम्ही Google Pixel 4a हा 26,999 रुपयात खरेदी करू शकता, त्याची सध्याची किंमत 29,999 रुपये आहे. याशिवाय iQoo 3 स्मार्टफोन 24,990 रुपयांपासून सुरुवात होईल. सध्या त्या फोनची किंमत 34,990 रुपये आहे. तर Motorola Razr 5G देखील फ्लिपकार्टवरील विक्रीचा भाग असेल आणि हा 89,999 रुपयात उपलब्ध होईल. या फोनची सध्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. iPhone प्रेमींसाठी फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 11 Pro 74,999 रुपयात उपलब्ध होईल, या फोनची सध्याची किंमत 79,999 इतकी आहे. iPhone XR देखील 39,999 रुपयात मिळेल, याची सध्याची किंमत 41,999 रुपये आहे. iPhone SE (2020) 31,999 रुपयात उपलब्ध होईल. याची सध्याची किंमत 32,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट मर्यादित कालावधीसाठी निवडलेल्या ऑफर्ससह विक्रीदरम्यान विशिष्ट 'क्रेझी डील्स' देखील आयोजित करेल. दिल्याप्रमाणे एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर इतर ऑफर्समध्ये 10 टक्के त्वरित सूट मिळेल. सर्व उत्पादनांवर उत्तम ऑफर येत आहेत. तुम्हाला विक्रीमध्ये ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा पर्यायही मिळेल. तुम्ही या लिंकवर क्लिक करून शॉपिंग करू शकता.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Discount offer, Flipkart

    पुढील बातम्या