मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /राजीव बजाज यांनी या तीन वृत्त वाहिन्यांना केलं ब्लॅकलिस्ट; म्हणाले...

राजीव बजाज यांनी या तीन वृत्त वाहिन्यांना केलं ब्लॅकलिस्ट; म्हणाले...

तीन वृत्त वाहिन्यांना केलं ब्लॅकलिस्ट...

तीन वृत्त वाहिन्यांना केलं ब्लॅकलिस्ट...

तीन वृत्त वाहिन्यांना केलं ब्लॅकलिस्ट...

  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : TRP रेटिंगमध्ये पुढे राहणाऱ्यासाठी काही चॅनल्स फसवणूक करीत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) यांनी तीन न्यूज चॅनेल्सना जाहिराती देणार नसल्याचे सांगितले आहे. या तीनही चॅनल्सना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे. रिपब्लिक टीवी (Republic TV) सह दोन मराठी चॅनल्सवर बनावटी TRP (Television Rating Point) बनविण्याच्या बातमीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपति MD राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी सांगितले की, त्यांची कंपनी बजाज ऑटोने जाहिरातींसाठी तीन चॅनल्संना ब्लॅकलिस्ट केलं आहे. बजाज यांच्या या निर्णयामुळे येणाऱ्या काळात या तीन वाहिन्यांच्या महसुलाला मोठा फटका सहन करावा लागू शकतो.

  CNBC-TV 18 सोबत बातचीत करताना बजाज यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीचा ब्रॅंड कधीच समाजात विष पसरवणाऱ्या (hate mongering) घटकाशी संबंधित नाही. ते पुढे म्हणाले की, एक मजबूत ब्रँड पाया आहे, ज्यावर मजबूत व्यवसाय उभा राहतो. बजाजने बिजनेस चॅनलला सांगितले की, आम्ही याबाबत स्पष्ट आहोत की आमचा ब्रँड कधीच तशा ब्रँड्स वा कोणत्याही संस्थांसोबत एसोसिअट होऊ शकत नाही. मात्र अद्याप त्यांनी ब्लॅकलिस्ट केलेल्या वाहिन्यांची नावे सांगितली नाहीत.

  हे ही वाचा-Parle G सोशल मीडियावर ठरलं जीनिअस! TV चॅनेल्सविषयी घेतली मोठी भूमिका

  या वाहिन्या समाजासाठी हानिकारक

  राजीव बजाज यांनी ब्लॅकलिस्ट वाहिन्या या समाजासाठी हानिकारक असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचा ब्रँड कधीच अशा गोष्टींशी वा संस्थांशी संबंधित नव्हता. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांनी बनावटी टीआरपी प्रकरणात अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) चे चॅनल Republic TV सोबत फक्त मराठी (Fakt Marathi) आणि बाॅक्स सिनेमा (Box Cinema) विरोधात FIR दाखल केली आहे. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर बजाज ऑटोने हा निर्णय घेतला आहे.

  First published: