Home /News /auto-and-tech /

Bajaj NEW-GEN KTM RC 200, KTM RC 125 भारतात लाँच: पाहा किमती आणि फिचर

Bajaj NEW-GEN KTM RC 200, KTM RC 125 भारतात लाँच: पाहा किमती आणि फिचर

दोन्ही मोटारसायकली खरेदी करण्यासाठी त्या आपल्या जवळच्या केटीएम आउटलेटवर बुक करता येऊ शकतात. तसंच, फायनान्सची निवडही करता येईल. डाऊन पेमेंटची रक्कम कमीत कमी 24,000 रुपयांपासून सुरू होते.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : बजाज ऑटोनं भारतात न्यू जनरेशन 2022 KTM RC 125 आणि KTM RC 200 या मोटरसायकल्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. RC 125 ची किंमत 1,81,913 रुपये आणि RC 200 ची किंमत 2,08,717 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. अशा प्रकारच्या बाईक्सच्या आधीच्या किंमतींइतक्याच साधारणपणे RC 125 आणि RC 200 दोन्हींच्या किमती आहेत. परंतु, 2022 च्या सुरुवातीला या किमती वाढण्याची शक्यता आहे. यांचं उत्पादन आधीच सुरू झालं असून 2022 KTM RC 200 ची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर, RC 125 ची डिलिव्हरी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. या दोन्ही मोटारसायकली खरेदी करण्यासाठी त्या आपल्या जवळच्या केटीएम आउटलेटवर बुक करता येऊ शकतात. तसंच, फायनान्सची निवडही करता येईल. डाऊन पेमेंटची रक्कम कमीत कमी 24,000 रुपयांपासून सुरू होते. नवीन RCs लाँच होण्यासाठी भारत ही जगातील पहिली बाजारपेठ असल्याचं KTM नं म्हटलं आहे. येत्या काही महिन्यांत न्यू जनरेशन KTM RC 390 देखील लाँच केली जाईल, असं त्यांनी म्हटलंय. KTM RC 125 आणि RC 200 दोन्हींमध्ये नवीन हेडलाइट्स (RC 200 साठी सर्व LED, RC 125 साठी हॅलोजन), LED दिवसा चालणारे दिवे आणि टर्न इंडिकेटर्स, टेल-लाइट, स्टिफर आणि हलकी स्प्लिट-स्टील ट्रेली फ्रेम (याच्यामुळं 1.5 किलो वजन कमी झालेय), नव्यानं डिझाइन केलेले आणि एअरोडायनॅमिक फेअरिंग, हँडलबार राइझर्स, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठी इंधन टाकी (13.7 लिटर - ही पहिल्या जनरेशनच्या मॉडेल्समध्ये 9.5 लिटरची होती). हे वाचा - 64MP कॅमेरासह Realme चा जबरदस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स इतर महत्त्वाचे बदल WP Apex fork, मोठा एअरबॉक्स, वजनाला हलकी अ‌ॅलॉय व्हील्स, हलके ब्रेक (320 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि 230 मिमी रिअर डिस्क ब्रेक, 'सुपरमोटो' ड्युअल-चॅनेल एबीएस दोन्ही बाइक्सवर), curved radiator, स्टिफर फ्रंट एक्सल, लेसर-टेक्सचर्ड विंड स्क्रीन आणि अॅल्युमिनियम पिलियन ग्रॅब हँडल. या मॉडेल्सचे वजन कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2022 KTM RC 125 चे वजन 150 किलो आहे; तर, 2022 KTM RC 200 चे वजन 151 किलो (ड्राय) आहे. हे वाचा -  Explainer: लहान मुलांसाठी Covaxin ची शिफारस; लस किती सुरक्षित? बालकांना द्यावी का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर एअरबॉक्स आणि रेडिएटरला ऑप्टिमायझेन केल्यामुळं केटीएमनं आरसी 125 आणि आरसी 200 देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या असल्याचा दावा केलाय. केटीएम आरसी 125 चे सिंगल-सिलेंडर, 124.7 सीसी युनिट 15 एचपी आणि 12 एनएम टॉर्क तयार करते, तर आरसी 200 चे 199.5 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन 26 एचपी आणि 19.5 एनएम टॉर्क तयार करते. हे आकडे देशाबाहेर विकल्या जाणाऱ्या बाईक्स तुलनेत जवळजवळ एकसारखे आहेत. दोन्ही बाइक्समध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स आहे. केटीएम आरसी 125 आणि आरसी 200 या दोन्हींच्या स्पर्धेत अलीकडेच लॉन्च केलेली यामाहा आर 15 व्ही 4.0 आहे. या बाईकची किंमत 1.68 लाखांपासून सुरू होते. ही अधिक चांगली असल्याचं म्हटलं जातंय.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike riding

    पुढील बातम्या