• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • सेमीकंडक्टर चीपमुळं ऑटो सेक्टर अडचणीत; सणासुदीच्या काळात वाहन डीलर्सना मोठा फटका बसणार?

सेमीकंडक्टर चीपमुळं ऑटो सेक्टर अडचणीत; सणासुदीच्या काळात वाहन डीलर्सना मोठा फटका बसणार?

सेमीकंडक्टर चीपच्या संकटादरम्यान वाहन उत्पादक त्यांच्या डिलर्सना पुरेशा प्रमाणात वाहनांचा पुरवठा करू शकत नसल्याचं चित्र आहे. यामुळे या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे (Auto retailers) मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सेमीकंडक्टर चीपच्या संकटादरम्यान वाहन उत्पादक त्यांच्या डिलर्सना पुरेशा प्रमाणात वाहनांचा पुरवठा करू शकत नसल्याचं चित्र आहे. यामुळे या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे (Auto retailers) मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेडा, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ व्हेईकल डीलर्सचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी याबाबत माहिती देताना, वाहनांच्या डीलर्सचे (Auto retailers) मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. गुलाटी म्हणाले, "चिपचं संकट सुरूच आहे. त्यामुळं वाहन उत्पादकांना उत्पादनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्यांच्या डीलर्सना पुरवठा कमी होत आहे. ” विक्रेत्यांकडे बुकिंग रद्द होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून वाहन विक्रेत्यांसाठी 42 दिवसांचा मोठ्या खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झालाय. मात्र, पुरवठा कमी झाल्यामुळं डीलर्स आपल्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीची वाहनं केव्हा उपलब्ध होतील, कधीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, याविषयी काही सांगू शकत नाहीयेत. अनेक मॉडेल्सना प्रचंड मागणी असताना डीलर्सकडे बुकिंग रद्द होत आहेत. त्याचबरोबर, डिलर्सकडे वाहनांचा पुरेसा साठा नसल्यामुळं ऑन-द-स्पॉट खरेदीमध्येही घट झाली आहे. हे वाचा - रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीनं दिला नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं! गुलाटी म्हणाले, “विक्रीच्या दृष्टीनं सणांचा कालावधी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. सरासरी, या दोन महिन्यांत, आम्ही आमच्या वार्षिक विक्रीच्या 40 टक्के लक्ष्य साध्य करतो. ही अशी वेळ असते, जेव्हा या व्यवसायातील लोक वर्षाच्या उर्वरित काळासाठी कमाई आणि बचत करू शकतो. या वर्षी आमच्याकडं उपलब्ध असलेल्या वाहनांची संख्या पुरेशी नाही. अशा स्थितीत आम्हाला नुकसान होण्याची भीती वाटते. प्रतीक्षा कालावधी तीन महिने ते म्हणाले, प्रवासी वाहन विभागातील बहुतेक मॉडेल्सचा प्रतीक्षा कालावधी एक ते तीन महिन्यांपूर्वी लक्षणीय प्रमाणात वाढलाय. डीलरशिपवर वाहनं उपलब्ध नसल्यामुळे ऑन-द-स्पॉट विक्रीवरही परिणाम झालाय. गुलाटी म्हणाले, “आमच्या आकडेवारीनुसार, 50 ते 60 टक्के खरेदीदार प्री-बुकिंग करतात. त्याच वेळी, उर्वरित 40 टक्के शोरूममध्ये येतात आणि लगेच वाहन खरेदी करतात. पण यंदा ही संधी आमच्यासाठी कमी झालीय. हे वाचा - आधार कार्डवरील जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करायचाय? ही कागदपत्रं आहेत आवश्यक सणासुदीच्या काळात 3 ते 3.5 लाख युनिट्सची विक्री होण्याचा अंदाज संपूर्ण परिस्थिती अतिशय आव्हानात्मक असल्याचं सांगून ते म्हणाले की, जर उद्योग या 42 दिवसांत विक्रीचं सामान्य लक्ष्य साध्य करू शकला तर, मोठं नशीबच मानलं जाईल. ते म्हणाले, “आम्हाला मोठ्या नुकसानीची भीती आहे. सणासुदीच्या काळात आमची किरकोळ विक्री 4 ते 4.5 लाख युनिट्स पर्यंत असते. परंतु यावेळी केवळ 3 ते 3.5 लाख युनिट्स असल्याचा अंदाज आहे. जर आम्ही हा आकडा साध्य करू शकलो तरीही आम्ही भाग्यवानच असू. ”
  Published by:News18 Desk
  First published: