Home /News /auto-and-tech /

चीन नाही सुधारणा, आता तर अस्सल भारतीय कारची केली कार्बन कॉपी!

चीन नाही सुधारणा, आता तर अस्सल भारतीय कारची केली कार्बन कॉपी!

चीनच्या वस्तूवर भारतात बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे चीनने आता भारतीय वस्तूंची कॉपी केल्याची बाबसमोर आली आहे.

    मुंबई, 25 जून : भारत आणि चीनमध्ये सीमेरेषेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूंवर  भारतात बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे चीनने आता भारतीय वस्तूंची कॉपी केल्याची बाबसमोर आली आहे. चीनची फेंगशेंग या कार उत्पादक कंपनीने भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या टाटा मोटर्सच्या एका SUV ची हुबेहूब कॉपी केली आहे. फेंगशेंगने Maple 30X नावाची एक  इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही कार दिसण्यात अगदी हुबेहूब Tata Nexon सारखी आहे. ही  SUV पूर्णपणे स्वदेशी आहे.  भारताप्रमाणे चीन सुद्धा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे.  मेपल 30x ची किंमत ही  68,800 RPM म्हणजे भारतीय चलनात 7.3 लाख रुपये इतकी आहे. मेपल 30X मध्ये टाटा नेक्सन सारखे काही फिचर्स सुद्धा पाहण्यास मिळाले आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिकल बॅटरी आहे, जी 94bhp पॉवर देते. त्यामुळे 10-12 सेंकदात ही कार 100 पेक्षा जास्त वेग घेते. एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार 300 किमी पर्यंत प्रवास करू शकते. फक्त 30 मिनिटांत ही कार 80 टक्के चार्ज होते. मेपल 30x च्या केबिनबद्दल जास्ती माहिती उपलब्ध झाली नाही. पण, या कारमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, क्लाइमेट कंट्रोल, जीकेयूआई इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इनबिल्ट कंट्रोलसोबत फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हिल दिले आहे. Tata Nexon जानेवारी 2020 मध्ये Nexon EV लाँच केली होती.  eXUV300 मध्ये दोन बॅटरी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.  यात 350V आणि 380V पावरट्रेन  पर्याय उपलब्ध आहे. ही एसयूव्ही फूल चार्ज केल्यावर 370 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. टाटा मोटर्सने  टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट (Nexon facelift) चे पेट्रोल व्हर्जन सुद्धा लाँच केले आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ही 6.95 लाख आणि डिझल मॉडेलची किंमत 8.45 लाख इतकी  आहे.  संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या