मुंबई, 23 जून : मोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी असलेल्या Apple ने आपल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स WWDC 2020 ची सुरुवात 22 जूनला केली. हा इव्हेंट 26 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple iOS 14 च्या नवीन फिचर्सबद्दल खुलासा करण्यात येणार आहे. Apple ने आणखी एक असे फिचर्स आणले आहे, ज्याचा संबंध थेट कारशी असणार आहे.
आयफोनमध्ये आता CarKey ऑप्शन देण्यात येणार आहे, असं Apple कंपनीने जाहीर केले आहे. CarKey हे ऑप्शन सर्वात आधी 2020 BMW 5 series मध्ये पाहण्यास मिळणार आहे. या शिवाय अनेक दमदार आणि शानदार फिचर्स असणार आहे. यामध्ये इम्प्रोवेमेन्ट्स, कॉन्टेक्ट्स इंटीग्रेशन, डॉक्युमेंट्स यासारखे अन्य फिचर्स असणार आहे.
कारसाठी चावीची नसणार गरज
लाखमोलाच्या कारची चावी सांभाळण्यासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागते. जर कुठे चावी गहाळ झाली तर नाहक त्रास सहन करावा लागतो आणि आर्थिक भुर्दंड बसतो तो वेगळाच असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून Apple कंपनीने हे फिचर घेऊन येणार आहे. नवीन NFC सिस्टमद्वारे फक्त कारच्या हँडलवर टॅप केले की गाडी अनलॉक होईल.
Apple just announced CarKey. The feature will let you unlock your car with just your iPhone (you can even digitally share the key with others). The BMW 5 Series will be the first the feature the tool. #WWDC2020 #WWDC20 https://t.co/UtQqLkg16I pic.twitter.com/mHNwZqCc72
— WIRED (@WIRED) June 22, 2020
iPhone टच केल्यानंतर सुरू होणार कार
या नवीन टेक्नोलॉजीमुळे युझर्सला चार्जिंग पॅडवर फक्त आयफोन ठेवावा लागणार आहे आणि त्यानंतर इंजन स्टार्ट आणि स्टॉप बटन पुश करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, कारमालक हा कोणत्याही व्यक्तीकडे आयफोन असेल त्या व्यक्तीसोबत तो अनलॉक सिस्टम शेअर करू शकतो. म्हणजे, ज्या प्रकारे आपण कारची चावी एकमेकांना देतो, त्याऐवजी हे फिचर्स आयफोन टू आयफोन शेअर करता येणार आहे. मग, ती व्यक्त शहरापासून दूर असली तरी तिला हे फिचर्स शेअर करता येईल.
हिंसाचाराच्या 7 दिवसानंतर चीन झुकलं, लष्करप्रमुख लेह-लडाख दौऱ्यावर
दरम्यान, बाजारात या फिचर्सशी संबंधित कोणतीही कार उपलब्ध नाही. परंतु, कंपनीने दावा केला आहे की, 2020 बीएमडब्ल्यू 5-सीरीजमध्ये हे फिचर्स पाहण्यास मिळणार आहे. ही कार पुढील महिन्यात लाँच होणार आहे. तसंच Apple iOS 13 मध्येही हे फिचर्स देण्यात येणार आहे.
संपादन - सचिन साळवे