Amazon Mega Salary Days: नवीन वर्षातील पहिल्या मोठ्या सेलची घोषणा, TV-लॅपटॉपवर मिळवा बंपर सूट

ई -कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर (Amazon) 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची (January 2021) ऑफर सुरु होणार आहे. शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरणार आहे.

ई -कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर (Amazon) 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची (January 2021) ऑफर सुरु होणार आहे. शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 30 डिसेंबर: ई -कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर (Amazon) 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची (January 2021) ऑफर सुरु होणार आहे. शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरणार आहे. 1 जानेवारीपासून हा सेल सुरु होणार असून 3 जानेवारीपर्यंत तुम्ही यामध्ये खरेदीचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप (Laptop), कॅमेरा, मोठे डिव्हाईस आणि टीव्ही (TV), आणि होम अँड किचन प्रोडक्ट तसंच इतर छोट्या-मोठ्या वस्तूंवर ऑफर आणि डिस्काउंट मिळणार आहेत. स्मार्टफोन आणि इतर डिवाइसवर देखील डिस्काऊंट (Special Deal) मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनचा Mega Salary Days अनेकांसाठी फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक्सचेंज ऑफर (Exchange Offer), नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळणार आहे. LG, Whirlpool, IFB, Boat, Sony आणि JBL आणि सॅमसंग वर विविध ऑफर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांना विविध बँक ऑफर्स मिळणार असून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक ऑफर आणि डिस्काउंट देखील मिळणार आहे. (हे वाचा-नव्या आयफोन्ससह मेड इन इंडिया आणि ऑनलाइन स्टोअरवर राहिला अ‍ॅपलचा भर) बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1,250 ते 1,500 रुपयांच्या खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट देखील मिळणार आहे. त्यामुळं ग्राहकांना फायदा होणार आहे. यामध्ये लॅपटॉप, टॅबलेट आणि हेडफोनवर देखील विविध प्रकारची सूट आणि ऑफर्स मिळणार आहेत. Boat, JBL, Mi  यांसारख्या कंपनीच्या साऊंडबारवर 30 टक्के तर जेबीएल कंपनीच्या हेडफोनवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. कुणाला लॅपटॉप किंवा हेडफोन घ्यायचा असल्यास ही योग्य संधी आहे. या काळात विविध स्पिकर्स आणि हेडफोनवर 9 महिने नो-कॉस्‍ट ईएमआई चा पर्याय देखील देण्यात आला आहे. मोठ्या होम अप्लायन्सेसवर मोठी सूट -या सेलमध्ये टीव्ही (TV) , फ्रिज आणि वॉशिंग मशीन सारख्या मोठ्या वस्तूंवर देखील सूट मिळत आहे. बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीनवर 35 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. रेफ्रिजरेटर्सवर देखील amazon चांगल्या ऑफर्स देत आहे. -Daikin, Lg आणि इतर टॉप ब्रॅण्डच्या एसीवर 35 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्याचबरोबर 32 इंचाच्या टीव्हीवर 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. (हे वाचा-250 रुपयांत 50,000 रुपयांचा फटका! Buy 1 get 2 ऑफर चांगलीच पडली महागात) -लॅपटॉप (Laptop), टॅबलेट (Tablet) आणि डेस्कटॉपवर देखील मोठी सूट मिळत आहे. तुम्हाला 30 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. शिवाय 30 टक्के सूट मिळवून टॉप ब्रँडचे टॅबलेट्स तुम्हाला खरेदी करता येतील. -विविध स्मार्टवॉचवर (Smartwatch) देखील 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच अँड्रॉइड टीव्हीवर 30 टक्के तर प्रिमिअम टीव्हीवर देखील 30 टक्क्यांपर्यंत मिळणार आहे. मायक्रोवेव्ह आणि किचनमधील रChimney वर देखील 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळं नववर्षाला खरेदी करायची असल्यास तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: