मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Electric Car Fire Video : स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईच्या रस्त्यावर Tata Nexon EV जळून खाक

Electric Car Fire Video : स्कूटरपाठोपाठ आता इलेक्ट्रिक कारही पेटली; मुंबईच्या रस्त्यावर Tata Nexon EV जळून खाक

इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक कारलाही आग लागल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक कारलाही आग लागल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक कारलाही आग लागल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मुंबई, 23 जून : गेल्या काही महिन्यांत देशात इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षततेबाबत बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आला. अशात एका इलेक्ट्रिक कारलाही आग लागल्याची घटना समोर आली आहे (Electric car fire). मुंबईत टाटा नेक्सन ईव्हीला (Tata Nexon EV) आग लागली आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Tata Nexon EV ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. याच कारने मुंबईच्या रस्त्यावर पेट घेतला आहे.  वसई पश्चिम परिसरातील ही घटना आहे. रस्त्यावर कार आगीच्या विळख्यात सापडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे.कार का पेटली यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे पण  प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे कारमध्ये आग लागल्याचं सांगितलं जातं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

हे वाचा - आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO

दरम्यान याबाबत टाटा मोटर्सने कारमध्ये आग का लागली, याचा तपास करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. कंपनीने सांगितलं की तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेची सविस्तर माहिती दिली जाईल. याआधी इलेक्ट्रिक टू व्हिलर्समध्ये लागलेल्या आगीच्या घटनांचा सविस्तर तपास सुरू आहे.

या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतं. याच्या मोटर 129 बीएचपी पॉवर आणि 245 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचंही ऑप्शन मिळतं. डीसी फास्ट चार्जर वापरून ही कार फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते. रेग्युलर चार्जरने 8 तासात  20 ते 100 टक्के चार्ज होते. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही कार 312 किमी प्रति रेंज देते.

हे वाचा - VIDEO - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू

टाटा मोटर्सने ( Tata Motors) नुकतीच भारतात Nexon EV Max सुद्धा लाँच केली आहे. ज्यात एक मोठं बॅटरी पॅक मिळतं, जी अधिक शक्ती आणि टॉर्क विकसित करतं. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार  437 किमी रेंज देत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Electric vehicles, Fire, Viral, Viral videos