'या' 4 कारणामुळे कार घेण्याची हीच ती वेळ, बचतही होईल दारात गाडीही उभी!

'या' 4 कारणामुळे कार घेण्याची हीच ती वेळ, बचतही होईल दारात गाडीही उभी!

, कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे गाड्यांची विक्री ठप्प झाली होती. आता कुठे अनलॉकमध्ये गाड्यांची विक्रीला वेग आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सप्टेंबर महिना संपत आला आहे आणि आता पुढील दोन महिन्यात दसरा, दिवाळी सणाचा काळ आला आहे. ऑटो इंडस्ट्रीसाठी हा काळ सर्वात लाभदायक आणि विक्रीचा असतो. पण, कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे गाड्यांची विक्री ठप्प झाली होती. आता कुठे अनलॉकमध्ये गाड्यांची विक्रीला वेग आला आहे. त्यामुळे हे चार मुद्दे तुमच्या फायद्याचे ठरू शकता.

1. पाच महिन्यापासून ठप्प असलेली ऑटो इंडस्ट्री मोठ्या जोमाने कामाला लागली आहे. एकापाठोपाठ अनेक कंपन्या आपल्या दमदार गाड्यांचे लाँचिंग करत आहे. दर आठवड्यात नवी बाइक आणि कार लाँच होत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात कारने प्रवास हा कुटुंबासाठी आणखी लाभदायक ठरत आहे.

नव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं

2. लॉकाडउनच्या काळात गाड्यांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे वाहन उत्पादन कंपन्यांनी विक्रीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून नव-नवीन ऑफर आणल्या आहे. या ऑफरमध्ये कित्येक गाड्यांवर हजारांपासून ते लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर तर ठरतीलच आणि स्वस्तात गाडीही घेता येईल.

 3. आता कार घ्यायची म्हटल्यावर फायन्ससचा विषय आलाच. विक्री वाढवण्यासाठी कारवर लोनच्याही दमदार ऑफर बँकांनी दिल्या आहे. जास्त टर्मसाठी आता लोन दिले जात आहे. एवढंच नाहीतर थोडे डाऊन पेमेंट करून गाडी तुम्हाला घरी घेऊन जाता येते आणि त्यानंतर काही महिन्यांनी हफ्ते भरण्यास सुरुवात करण्याची ऑफरही दिली आहे. एवढंच नाहीतर लीजवरही कार खरेदी करता येत आहे.

 

चेन्नई सुपरकिंग्ज आज मुंबई इंडियन्सला हरवणारच! धोनीकडे आहे खास प्लॅन

4. जर तुमचे नवीन गाडी विकत घेण्याचे बजेट नसेल तर तुम्ही वापरलेली अर्थात सेंकड हँड कार खरेदी करू शकता. आता तर मारुती सुझुकी आणि महिंद्राने सेंकड हँड कार विक्रीसाठी वेगळी शोरूमस थाटली आहे. इथं तुम्हाला नव्या गाडी प्रमाणे ईएमआयवर गाडीही विकत घेता येते. एवढंच नाहीतर ऑनलाइन वेबसाइटवर तुम्हाला गाड्यांची माहितीही मिळून जाईल.

Published by: sachin Salve
First published: September 19, 2020, 5:34 PM IST

ताज्या बातम्या