मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

बुकिंग करूनही अद्याप डिलीव्हरी नाही; तब्बल 7 लाख लोक Car च्या प्रतीक्षेत कारण...

बुकिंग करूनही अद्याप डिलीव्हरी नाही; तब्बल 7 लाख लोक Car च्या प्रतीक्षेत कारण...

ऑटो सेक्टर गाड्यांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने लोकांना नव्या गाडीसाठी मोठी वाट पाहावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 7 लाख लोक आपल्या नव्या गाडीच्या डिलीव्हरीच्या प्रतिक्षेत आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : कोरोना काळात डबघाईला आलेलं ऑटो सेक्टर आता कोरोनानंतर पुन्हा एकदा तेजीत आहे. गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. परंतु ऑटो सेक्टर गाड्यांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने लोकांना नव्या गाडीसाठी मोठी वाट पाहावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 7 लाख लोक आपल्या नव्या गाडीच्या डिलीव्हरीच्या प्रतिक्षेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या 7 लाख लोकांनी गाडी खरेदीसाठी बुकिंग केलं आहे. परंतु गाडीची डिलीव्हरी अद्याप मिळालेली नाही. हे लोक एखाद्या खास गाडीच्या डिलीव्हरीसाठी वाट पाहत आहेत असं नाही, तर प्रत्येक प्रकारच्या गाडीची वेटिंग लिस्ट मोठी होत आहे. मारुति सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा गाडीसाठी एक-एक लाख लोक कार डिलीव्हरीसाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. Kia मोटर्सचे 75 हजार ग्राहक वेटिंग लिस्टमध्ये आहेत. परंतु कंपन्या कार डिलीव्हरी देऊ शकत नाहीत.

सेमीकंटक्टर चीपच्या कमतरतेचा परिणाम -

ऑटोमोबाइल सेक्टर सध्या सेमीकंटक्टर चीपच्या कमतरतेचा सामना करत आहे. सेमीकंटक्टर चीपच्या कमतरतेमुळे जगभरात 170 इंडस्ट्रीज समस्येत आहेत. त्यापैकी एक ऑटो सेक्टर आहे.

150 लाख कोटींचं नुकसान -

सेमीकंटक्टर चीपच्या कमतरतेमुळे यावर्षात ऑटो इंडस्ट्रीला जवळपास 150 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. जपानची कंपनी टोयोटालाही चीपच्या कमतरतेमुळे मोठं नुकसान होत आहे.

सेमीकंटक्टर म्हणजे काय?

सध्या इलेक्ट्रिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी सेमीकंटक्टर एक अनिवार्य भाग आहे, जो घरात वापर होणाऱ्या उपकरणांपासून स्मार्टफोन आणि वाहन निर्मितीसाठी कामी येतो. एका गाडीत पॉवर स्टेअरिंग, ब्रेक सेंसर, एंटरटेनमेंट सिस्टम, एयर बॅग आणि पार्किंग कॅमेरामध्ये सेमीकंटक्टर चीपचा वापर होतो. सेमीकंटक्टर म्हणजे अर्धसंवाहक अर्थात अशी सामग्री ज्यात विशिष्ट विद्युतीय गुणधर्म आहेत. अर्धवाहक हा इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता विद्युतवाहक व अवरोधक यांच्या मधली असते.

Electric Vehicles वर किती विश्वास ठेवायचा? पाहा काय सांगतो अभ्यास

सेकंड हँड कार मार्केटमध्ये वाढती मागणी -

नव्या गाड्यांची वेटिंग लिस्ट मोठी असल्याने सेकंड हँड कार मार्केटमध्ये तेजी आहे. मार्केटमध्ये नव्या कारची कमी असल्याने कार कंपन्या सतत किंमती वाढवत आहेत. त्यामुळे अनेक जण सेकंड हँड मार्केटकडे वळत असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Car