मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

बाजारात लवकरच लॉंच होणार `या` तीन नवीन एसयूव्ही; किफायतशीर दरांसह असतील खास फीचर्स

बाजारात लवकरच लॉंच होणार `या` तीन नवीन एसयूव्ही; किफायतशीर दरांसह असतील खास फीचर्स

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिंद्रा कंपनी लवकरच देशात बोलेरो निओ प्लस एसयूव्ही लॉंच करणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : ग्राहकांची मागणी आणि कल लक्षात घेत कंपन्या अनेकविध फीचर्स असलेल्या कार बाजारात लॉंच करत असतात. संपूर्ण कुटुंबाला एकाच गाडीतून प्रवास करता यावा, यासाठी अनेक ग्राहकांचा कल आकाराने मोठ्या कारकडे असतो. त्यामुळे बाजारात एसयूव्ही कारला मागणी वाढली आहे. सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये खास फीचर्स असली तरीही त्यांची किंमत तुलनेनं जास्त आहे.

तुम्ही एसयूव्ही कार खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तीन नव्या एसयूव्ही बाजारात लवकरच लॉंच होणार आहेत. विशेष म्हणजे या तीनही एसयूव्ही कार किफायतशीर दरांत ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.

सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या खास फीचर्स असलेल्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. आरामदायी प्रवासासाठी ग्राहकांचा कल एसयूव्ही खरेदीकडे वाढतोय. पण या कारच्या किमती तुलनेनं जास्त आहे. मात्र ग्राहकांचा कल लक्षात घेत महिंद्रा, सिट्रॉन आणि निसान या कंपन्या किफायतशीर दरांत नव्या एसयूव्ही बाजारात लॉंच करणार आहेत. निसान इंडिया मॅग्नाईट सब-4 सीटर एसयूव्हीवर आधारित 7-सीटर एसयूव्ही लॉंच करण्याचा विचार करत आहे. या एसयूव्ही कारची किंमत 8 लाख ते 15 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

भारतात उपलब्ध होणारी या प्रकारातली ही सर्वांत स्वस्त 7 -सीटर एसयूव्ही असू शकते. या कारमधली बहुतांश फीचर्स आणि डिझाइन एलिमेंट हे मॅग्नाईट-5 सीटर सारखीच असतील. 7-सीटर एसयूव्हीमध्ये 1.0L NA पेट्रोल इंजिन (72bhp) आणि 1.0 टर्बो पेट्रोल इंजिन (100 bhp) असेल.

सिट्रॉन सी 3 वर आधारित 7-सीटर एसयूव्हीची नुकतीच भारतात चाचणी झाली आहे. लॉंच केल्यावर ती सर्वांत स्वस्त 7-सीटर एसयूव्हींपैकी असू शकते. ही कार पुढच्या वर्षी शोरुममध्ये दाखल होऊ शकते. नव्या सिट्रॉन 3 रो मॉडेलची अंदाजे किंमत 9.50 लाख ते 17.50 लाख रुपयांदरम्यान असेल. ही c3 हॅचबॅक पेक्षा लांब असेल. वेगळ्या डिझाईनचं ग्रील, फ्रंट बंपर आणि लोअर पोझिशन फॉग लॅंप तसंच वैशिष्टयपूर्ण डिझाईन ही या कारचा वेगळेपणा दाखवणारी वैशिष्ट्य असतील.

महिंद्रा कंपनी लवकरच देशात बोलेरो निओ प्लस एसयूव्ही लॉंच करणार आहे. या एसयूव्हीमध्ये थारमध्ये वापरण्यात येणारं 2.2LmHawk डिझेल इंजिन असेल. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्सच्या पर्यायासह असेल. ही एसयूव्ही P4 आणि P10 अशा दोन व्हेरियंटमध्ये लॉंच होईल. यात 7 आणि 9 अशी दोन सिटिंग कॉन्फिगरेशन्स असतील. महिंद्रा बोलेरो निओ प्लसच्या एंट्री-लेव्हल व्हेरियंटची किंमत सुमारे 10 लाख रुपये तर फुल्ली लोडेड मॉडेलची किंमत 12 लाख रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Car, Tech news