नवीन कार खरेदी करताना मिळणार 25 टक्के डिस्काऊंट, पाहा सरकारचा खास प्लान

नवीन कार खरेदी करताना मिळणार 25 टक्के डिस्काऊंट, पाहा सरकारचा खास प्लान

प्रदुषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकार जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी (vehicle Scrapping Policy)आणत आहे. या पॉलिसीमुळे वाहन उद्योगात (Auto Sector) तेजी येणार असून, नव्या वाहनांची मागणी वाढेल, त्यांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत घट होईल आणि रोजगार संधी मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : प्रदुषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकार जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी (vehicle Scrapping Policy)आणत आहे. या पॉलिसीमुळे वाहन उद्योगात (Auto Sector) तेजी येणार असून, नव्या वाहनांची मागणी वाढेल, त्यांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत घट होईल आणि रोजगार संधी मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या धोरणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी नव्या खासगी वाहन (Private Vehicle) आणि व्यावसायिक वाहन (Commercial Vehicle) खरेदीवर विशेष सवलत देखील दिली जाणार आहे. तसेच 8 वर्षे जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स (Green Tax) आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या करातून मिळालेला पैसा पर्यावरण रक्षणासाठीच्या उपक्रमांकरिता खर्च केला जाणार आहे.

जर तुम्ही 1 ऑक्टोबरनंतर एखादे वाहन विकत घेतल्यास आणि जुने वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार स्क्रॅप केले, तर तुम्हाला नवी कार खरेदीवेळी करात 25 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. केंद्र सरकारने मार्चमध्ये स्क्रॅपिंग पॉलिसीची मसुदा अधिसूचना (Draft Notification)जारी केली होती. त्यात सरकारने स्पष्टपणे म्हटलं होतं की, प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी 15 वर्ष जुनी व्यावसायिक वाहने आणि 20 वर्ष जुनी बिगर व्यावसायिक वाहने स्क्रॅप केली जातील. तसेच जी वाहने 8 वर्ष जुनी असतील त्यावर ग्रीन टॅक्स किंवा हरित कर लावण्यात येईल आणि या करातून मिळालेली रक्कम पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमासाठी खर्च केली जाईल. रस्ते दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार व्हेइकल स्क्रॅपिंग प्रमाणपत्रासह (Vehicle ScrappingCertificate) खासगी गाडी खरेदी करतेवेळी रोड टॅक्सवर 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तर व्यावसायिक कारणासाठी गाडी खरेदी केल्यास त्यावर 15 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

15 वर्षांपर्यंत मिळणार सूट

मसुदा अधिसूचनेनुसार,स्क्रॅपिंग प्रमाणपत्रासह प्रवासी गाडी खरेदी करणाऱ्यास 25 टक्के आणि व्यावसायिक कारणासाठी गाडी खरेदी करणाऱ्यास 15 टक्के सूट दिली जाणार आहे. नोटिफिकेशन नुसार, व्यावसायिक वाहनांवर 8 वर्षांपर्यंत सूट मिळेल तर खासगी वाहन खरेदी केल्यावर नोंदणी दिनांकापासून 15 वर्षांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

ऑटो सेक्टर मध्ये मागणी वाढेल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) यांच्या म्हणण्यानुसार, स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर नव्या वाहनांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी होतील. तसेच त्यामुळे देशात नव्या वाहनांना मागणी वाढेल. ऑटो सेक्टरमध्ये तेजी येईल. यामुळे रोजगार संधी वाढतील आणि सुमारे 35 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

First published: May 9, 2021, 7:40 AM IST

ताज्या बातम्या