BMW ने भारतात लाँच केली MINI JCW; किंमत असेल इतकी

BMW ने भारतात लाँच केली MINI JCW; किंमत असेल इतकी

MINI JCW ची किंमत पाहाल तर व्हाल थक्क

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मे : बीएमडब्ल्यू (BMW) ने 2019 MINI JCW (John Cooper Works) ही कार भारतात लाँच केली. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 43.5 लाख रुपयांपासून सुरू होते. Mini JCW चं हे फेसलिफ्ट व्हर्जन आहे.

ही MINI 3-door Hatch कार असून यात 2 लीटरचं इंजिन लागलेलं आहे, जे 231hp पावर देतं. Mini 2017 हे JCW चं प्रो एडिशन होतं जी 20 युनिट्सची एक लिमिटेड एडिशन होती. आता भारतात Mini Cooper चा नवा अवतार पहायला मिळणार आहे.

अशी आहेत फीचर्स -

Mini JCW मध्ये 2 लीटर फोर-सिलिंडर इंजिन देण्यातत आलं आहे. जे 231 bhp ची पावर आणि 320 Nm चा टॉर्क जनरेट करते. 100 kmph चा वेग गाठण्यासाठी या गाडीला फक्त 6.1 सेकंद लागतात.

Mini JCW मध्ये स्पोर्ट ब्रेक सिस्टिम लावण्यात आली आहे. अपरेटेड स्प्रिग्स, डॅम्पर्स आणि लाइटेन्ड सस्पेंशन ही याची विशेषता. तसंच या गाडीमध्ये नवे अँटी-रोल बार्स, लाइटवेट सपोर्ट बीयरिंग आणि ट्रिपल-पाथ स्ट्रट माउंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय स्पोर्ट, कंफर्ट आणि एफिशिएंसी मोड्स यात देण्यात आले आहेत.

Mini JCWचा समोरचा भागात आणि व्हीलमध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. मात्र, यूनियन जॅक टेल लॅम्प्स मात्र कायम आहेत. तर केबिन पूर्ण ब्लॅक ठेवण्यात आली आहे.

First published: May 9, 2019, 8:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading