Home /News /aurangabad /

कुटुंबापेक्षा सिगारेट ठरली महत्त्वाची; औरंगाबादेतील तरुणाचं कृत्य वाचून लावाल डोक्याला हात

कुटुंबापेक्षा सिगारेट ठरली महत्त्वाची; औरंगाबादेतील तरुणाचं कृत्य वाचून लावाल डोक्याला हात

Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला कुटुंबापेक्षा सिगारेट महत्त्वाची ठरली आहे.

    वाळूज, 08 जानेवारी: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज (Waluj) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 19 वर्षीय तरुणाला त्याच्या भावाने येथून पुढे सिगारेट ओढू नको, असा सल्ला (brother advice to leave Cigarette) दिल्याने संबंधित तरुणाने थेट घरच सोडलं (Young man leave home) आहे. राग शांत झाल्यावर तो परत घरी येईल असं घरच्यांना वाटलं. पण दोन दिवस उलटूनही तो घरी आला नाही. अखेर संबंधित तरुणाच्या आईनं एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार (Missing complaint) दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत. पंकज दिगंबर सोंडारे असं घरातून निघून गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील ओमसाईनगरात राहतो. 5 जानेवारी रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास पंकज रागाच्या भरात घरातून निघून गेला आहे. केवळ सिगारेट न ओढण्याचा सल्ला घरच्यांनी दिला होता. पण कुटुंबापेक्षा सिगारेट त्याच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. याच रागातून त्यानं घर सोडलं आहे. हेही वाचा-'मामा, लवकर या आमचा सगळ्यांचा गळा चिरलाय', महाराष्ट्राला हादरवणारी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पंकजला सिगारेट ओढण्याचं व्यसन लागलं होतं. आपल्या कुटुंबापासून लपून तो सिगारेट ओढत असे. पण पंकज सिगारेट ओढत असल्याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला मिळाली. त्यामुळे त्याने 'येथून पुढे सिगारेट ओढणं बंद कर' असा सल्ला दिला. यातूनच पंकजचा आपल्या घरच्यांशी किरकोळ वाद झाला. हेही वाचा-पतीवरील रागाचा 2 चिमुकल्यांशी घेतला बदला; पुण्यात जन्मदात्या आईचं राक्षसी कृत्य या वादानंतर रागाच्या भरात पंकजने घर सोडलं. राग शांत झाल्यावर पंकज परत येईल, असं घरच्यांना वाटलं. पण पंकज घर सोडून दोन दिवस झाले तरी परत आला नाही. त्यामुळे अखेर घाबरलेल्या आईनं वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पंकजचा शोध घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad

    पुढील बातम्या