औरंगाबादेत युवक युवतीचा भयावह शेवट; एकाच झाडाला गळफास घेत संपवलं जीवन

औरंगाबादेत युवक युवतीचा भयावह शेवट; एकाच झाडाला गळफास घेत संपवलं जीवन

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका युवक युवतीनं शेतातील झाडाला गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या सिल्लोड (Sillod) तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील जळकी बाजार गावात एका युवक युवतीनं शेतातील झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Young man and minor girl commits suicide) केला आहे. सोमवारी सकाळी संबंधित घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. अंजिठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजनंदिनी कैलास दांडगे (16) आणि शरद आस्तिकराव दांडगे (20) असं आत्महत्या करणाऱ्या युवक युवतीचं नाव आहे. संबंधित दोघंही राजनंदीनी यांच्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहे. सोमवारी सकाळपासूनचं युवती घरात दिसत नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण मुलीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर शेताकडे जाऊन पाहणी केली असतान, राजनंदिनी आणि शरद दोघंही बांधावरील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत.

हेही वाचा-शिवसेना आमदाराला अडकवलं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीला राजस्थानातून अटक

या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. संबंधित युवक युवतीनं सोमवारी पहाटे 5 ते 6 च्या सुमारास एकत्रित आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. अजिंठा पोलीस या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-पुण्यातील विवाहितेसोबत विकृतीचा कळस; नोकरीच्या बहाण्यानं परळीत नेलं अन्...

विशेष म्हणजे मृत शरद दांडगे यानं सहा महिन्यांपूर्वी राजनंदिनी दांडगे यांची शेतजमीन बटाईनं करण्यासाठी घेतली होती. दरम्यान त्यांनी अशा प्रकारे जीवनाचा शेवट केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Published by: News18 Desk
First published: November 23, 2021, 10:30 AM IST

ताज्या बातम्या