Weather Forecast: बळीराजाच्या संकटात वाढ; मराठवाड्यात वाढतोय ढगफुटीचा धोका

Weather Forecast: बळीराजाच्या संकटात वाढ; मराठवाड्यात वाढतोय ढगफुटीचा धोका

Weather Forecast: मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यात (Marathwada) ढगफुटीचा (Cloudburst) धोका वाढताना दिसत आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 19 जुलै: मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसानं (Heavy rainfall) कहर केला आहे. शुक्रवार आणि शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसानं मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे मुंबईकराचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण मराठवाड्यातही (Marathwada) ढगफुटीचा (Cloudburst) धोका वाढताना दिसत आहे. काही मिनिटांत वेगानं मुसळधार पाऊस पडण्याचं प्रमाण मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वाढलं आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडल्यानं मराठवाड्यातील शेतीचं नुकसान होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होतं आहे.

हा ढगफुटीचा प्रकार आहे की नाही? याबाबत हवामान तज्ज्ञांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. पण अशाप्रकारे जोराचा पाऊस पडल्यानं शेतीच्या नुकसानीसोबत जनजीवन देखील विस्कळीत होत आहे. मागील दोन वर्षांपासून अशा प्रकारचा पाऊस पडण्याचे प्रकार मराठवाड्यात वाढले आहेत. सध्या लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाचं चांगलं प्रमाण आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्प परिसरातही वारंवार अशा पावसाची हजेरी लागत आहे. तर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होतं आहे.

हेही वाचा-पुढील 5 दिवस मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात अवघ्या आठ मिनिटांत 21 मिमी इतका पाऊस झाला आहे. पण ही ढगफुटी नसून 'अतिवृष्टी' असल्याचा दावा हवामान खात्याकडून केला जात आहे. शासकीय नियमाप्रमाणे, एकाच दिवशी अथवा ठरावीक काळात 65 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला, तर त्याला अतिवृष्टीचे निकष लागू होतात. 65 ते 125 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला तर 'खूप जास्त पाऊस' आणि 250 मिमीहून अधिक पाऊस झाला तर 'अत्यंत जास्त पाऊस' असे निकष हवामान खात्याकडून वापरण्यात येते.

हेही वाचा-LIVE: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट

ढगफुटी मोजण्यासाठी किती वेळेत किती पाऊसाची नोंद व्हायला हवी, याबाबत हवामान खात्याकडे कोणतीही मापन पद्धत नाही, अशी माहिती हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. तर हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औधकर यांच्या मते, एका तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक म्हणजे 4 इंचाहून अधिक पाऊस झाला तर अशा पावसाला ढगफुटी म्हणता येईल. त्यामुळे मागच्या काही वर्षात मराठवाडा विभागात अशाप्रकारच्या पावसाचं प्रमाण वाढलं असून ढगफुटीचा धोका वाढत आहेत.

Published by: News18 Desk
First published: July 19, 2021, 8:19 AM IST

ताज्या बातम्या