Marathawada Mukti Sangram Din: "ज्याप्रमाणे निजामाशी लढलो त्याप्रमाणे कोविडशी लढू" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Marathawada Mukti Sangram Din:

Marathawada Mukti Sangram Din 2021: मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

  • Share this:

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त (Marathawada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत म्हटलं, मराठवाडा निजामशाहीतून मुक्त केला आता कोविडवर वार करायची वेळ आली आहे.

ज्याप्रमाणे निजामाशी लढलो त्याप्रमाणे कोविडशी लढू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पिढ्या किती बदलल्या, किती पुढे सरकल्या तरी मराठवाड्याच्या रक्तामध्ये जे एक शौर्य आहे, जिद्द आहे ते कोणी आलं तरी पुसू शकत नाही. पण आपल्यासाठी कोणी काय काय केलं त्याची एक जाण म्हणून एक स्मृतीदालन इथं निर्माण केलं. त्यावेळचा जो काही काळ होता. निजामाची एक मस्ती होती, आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही आम्ही संघ राज्यात सहभागी होणार नाही अशी भूमिका होती त्यांची. लाल किल्ल्यावर आपलं निशाण फडकवायचं अशी मस्ती होती.

'सोनू सूदवर आयकर धाडी म्हणजे रडीचा डाव, हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल', शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

गेल्यावर्षी कोविडमुळे येऊ शकलो नाही. मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो विनाकारण इकडे तिकडे फिरु नका. चेहऱ्यावर मास्क लावा. एका गोष्टीचं मला समाधान आहे, हा माझा मराठवाडा ज्या जिद्दीने तेव्हा निजमाशी लढला तसाच कोविडसोबत सुद्धा लोढतोय. ही सुद्धा लढाई साधी नाहीये, ही सुद्धा जीवघेणी लढाई आहे. या लढाईत शिस्त आणि संयम आवश्यक आहे. ही लढाई संयमाने जिंकायची आहे.

मुख्यमंत्र्यांकडून औरंगाबादमध्ये संतपीठाची घोषणा

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद संतपीठाची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण सुरू करत आहोत. संतांची शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी संतपीठ उभारतोय. संतपीठ हे फक्त प्रेक्षणीय स्थळ राहता कामा नये. आज संतपीठ उभारतोय हे संत विद्यापीठ झालं पाहिजे जे जगात इतर कुठेही नसेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Published by: Sunil Desale
First published: September 17, 2021, 10:00 AM IST

ताज्या बातम्या