VIDEO : बीडमधील धक्कादायक प्रकार; तरुणांनी जयंतीनिमित्त तलवार हातात घेऊन डीजेच्या तालावर धरला ठेका

VIDEO : बीडमधील धक्कादायक प्रकार; तरुणांनी जयंतीनिमित्त तलवार हातात घेऊन डीजेच्या तालावर धरला ठेका

कोरोनाचे नियम पायदळी तुडवून, बीडच्या माजलगाव तालुक्यातील शिमरी पारगावमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काही अतिउत्साही तरुणांनी डीजे लावून धूमधडाक्यात साजरी केली.

  • Share this:

बीड, 15 मे : कोरोनाचे नियम पायदळी तुडवून, बीडच्या माजलगाव तालुक्यातील शिमरी पारगावमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काही अतिउत्साही तरुणांनी डीजे लावून धूमधडाक्यात साजरी केली. यावेळी हातात तलवार घेऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत तरुणानी गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. एकीकडे बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोणाचे रुग्ण आढळून येत असताना, अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून अद्याप यावर काहीच कारवाई केली गेली नाही. यामुळं पोलीस प्रशासन अशा अतिउत्साही तरुणांवर गुन्हा दाखल करणार का? असाच प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

बीड जिल्ह्यात दररोज बाराशेेेे ते पंधराशे नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना संपूर्णतः बंदी असल्याचं सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असताना बीडच्या माजलगावमधील पारगाव येथील काही अतिउत्साही तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थेट गावाच्या चौकात डीजे लावून ताल धरला.

हे ही वाचा-ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी; लेकीवर ओढावला भीषण प्रसंग

मात्र यावेळी कोरोनाचे नियम आणि सोशल डिस्टंन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता. गावा खेड्यात कोरोना पोहोचल्यानंतर रुग्णांना उपचार देखील मिळत नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झालेला असताना अशा पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम करणे व कोरोनाचे नियम पायदळी तुडवणे हे चुकीचे आहे. मात्र या प्रकारात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. हा जयंती उत्सव सुरू असताना ग्रामपातळीवरील ग्रामसेवक तलाठी व संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी या कार्यक्रमाकडे का डोळे झाक केेली हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामधून गावात जर कोरोनाचा संसर्गग वाढला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 15, 2021, 6:23 PM IST

ताज्या बातम्या