मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /'उद्धव ठाकरे चांगले डॉक्टरच, म्हणून भाजपचं ऑपरेशन केलं', सेनेचं पाटलांना जशास तसे उत्तर

'उद्धव ठाकरे चांगले डॉक्टरच, म्हणून भाजपचं ऑपरेशन केलं', सेनेचं पाटलांना जशास तसे उत्तर

'भाजपचे चांगलेच ऑपरेशन करून सरकार सत्तेत आणलं, त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे'

'भाजपचे चांगलेच ऑपरेशन करून सरकार सत्तेत आणलं, त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे'

'भाजपचे चांगलेच ऑपरेशन करून सरकार सत्तेत आणलं, त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे'

औरंगाबाद, 04 ऑगस्ट : 'कोरोना (corona) हा फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्यासोबत बोलतो, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (chandrakant patil) यांनी केली होती. पण, आता उद्धव ठाकरे हे चांगले डॉक्टर आहे म्हणून भाजपचं ऑपरेशन करून सेना सत्तेत आली' असा सणसणीत टोला शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

औरंगाबादमध्ये आज भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जशात तशा भाषेत उत्तर दिले.

ॲसिडिटी आणि करपट ढेकरांचा त्रास? डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितला जालीम उपाय

'होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डॉक्टर आणि संजय राऊत कम्पाउंडर आहेत. कारण त्यांनी भाजपचे चांगलेच ऑपरेशन करून सरकार सत्तेत आणलं, त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली नाही म्हणून चंद्रकांत पाटील हे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे, असा खणखणीत टोला सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

तसंच, 'केंद्र सरकारकडून वारंवार राज्य सरकारला पत्र पाठवून कोरोनाची काळजी घेण्याचं सांगितलं जात आहे, निर्बंध घालावे असं सांगत आहे. तिसऱ्या लाटेबद्दल सजग राहण्यास सांगत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार पूर्णपणे तयारी करत आहे. पण, भाजपचे नेते आंदोलनं करत आहे' असंही दानवे म्हणाले.

रणवीर सिंग 2.0' रितेश देशमुखला पाहून चाहत्यांना येतेय रणवीरची आठवण, पाहा PHOTOS

पण, राजकीय आखाडा घेत असेल तर 2019 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचंच चांगलं ऑपरेशन केलं आहे. त्यामुळे भाजपचे नेते निराश झाले असून नाराजीतून त्यांची अशी विधान येत आहे, असा टोलाही दानवेंनी लगावला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

'महाविकास सरकारने आतापर्यंत फक्त केंद्राला दोष देत आले आहे. एकीकडे दोष देत आहे आणि दुसरीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण हे राज्यात झाल्याचा दावा करत आहे. त्यामुळे 65 कोटींचं लसीकरण झालं आहे, बहुतांश लोकांना लशीचे दोन डोस दिले आहे. त्यामुळे कोविडची तिसरी लाट येणारच नाही असं भाकित सांगायला मी काही उद्धव ठाकरे यांच्यासारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांच्यासारखा कंपाऊंडर नाही. कारण, कोविड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो.  आता लाट कमी झाली, आता लाट वाढणार आहे, असं कोविड त्यांना सांगत आहे, माझ्याशी काही बोलत नाही' असा टोला पाटील यांनी लगावला होता.

First published: