मुंडे बहीण-भावांमध्ये पुन्हा जुंपली; कोरोनाच्या संकटात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण

मुंडे बहीण-भावांमध्ये पुन्हा जुंपली; कोरोनाच्या संकटात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण

बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसीवीर इंजेक्शन तुटवडा, लशीची उपलब्धी यावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर सुरू झाले आहे.

  • Share this:

बीड, 16 एप्रिल : बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि रेमडिसीवीर इंजेक्शन तुटवडा, लशीची उपलब्धी यावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात चांगलेच ट्विटर वॉर सुरू झाले आहे. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात भाष्य करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात केवळ वीस रेमडीसीवीर इंजेक्शन पोहोचल्याचा आरोप करत माफियाराज होत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. माफिया आणि गुत्तेदार यांनाच पालकमंत्र्यांचे अभय असल्याची बोचरी टीका पंकजा मुंडे यांनी केली. या संदर्भात आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र देखील पाठवले असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

यावर धनंजय मुंडेनीही पलटवार केला. ते यावेळी म्हणाले की, खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर माहिती घेऊन बोलत जावं. बीड जिल्ह्यात पुरेसा साठा आहे आणि लसदेखील उपलब्ध आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र देण्यापेक्षा एखादं पत्र पंतप्रधान यांना देऊन राज्यातील लस पुरवठा करण्याबाबत सुचवावा असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

हे ही वाचा-बीडमध्ये महिलेचा प्रताप! प्रतिष्ठित व्यक्तीशी लग्न करून उकळले लाखो रुपये

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. बीड जिल्ह्यात केवळ वीस इंजेक्शन शिल्लक असून पालकमंत्री यांनी माफियांना सूट दिली आहे. ज्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून राज्याला जेवढी लस मिळाली त्यात बीड जिल्ह्याला केवळ वीस डोस मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र पंकजा मुंडे यांचे आरोप खोडुन काढत अभ्यास करून बोला अस म्हणत बीड जिल्ह्यात किती डोस शिल्लक आहेत अन किती वापर झाला आहे याची डिटेल आकडेवारी दिली आहे. खूप दिवसांनी बाहेर पडल्यावर असे खोटे आरोप केले जातात. मात्र आरोप करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. असं म्हणत जर आरोप करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तर बरे होईल अस म्हटलं आहे. याला उत्तर देताना पंतप्रधान, मुख्यमंत्री, शरद पवारांनाही पत्र लिहिन पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी पलटवार केला. राज्याच्या भल्यासाठी मी नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन. त्याची दखलही घेतली जाईल. पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा, असा टोला भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी लगावला आहे.  तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या