Home /News /aurangabad /

ट्रक-रिक्षांच्या धडकेत 2 जण ठार, एकाच दिवशी निघाली दोन जिवलग मित्रांची अंत्ययात्रा

ट्रक-रिक्षांच्या धडकेत 2 जण ठार, एकाच दिवशी निघाली दोन जिवलग मित्रांची अंत्ययात्रा

अपघातात दोन मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव रिक्षा ट्रकवर आदळल्या आणि हा अपघात झाला.

    औरंगाबाद, 20 एप्रिल : अपघातात दोघा जीवलग मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हायवेवर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव रिक्षा ट्रकवर आदळल्याने (Rickshaw-Truck Accident) हा अपघात झाला. ही घटना पैठण रस्त्यावरील गेवराईजवळ रविवारी रात्री घडली. हबीब इसाक चाऊस (30) आणि अफरोज पठाण (35, दोघेही रा. अरबगल्ली, बिडकीन) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. बिडकीन येथील हबीब आणि अफरोज हे दोघेही रिक्षा चालवून कुटुंबाचा उदर्निवाह करायचे तसेच लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते, असे सांगण्यात सांगण्यात येत आहे. दररोज शहरात जावून दिवसभर रिक्षा चालविल्यानंतर रात्री परत गावाकडे जायचे. रविवारी देखील दोघांनी दिवसभर रिक्षा चालविली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास बिडकीनच्या दिशेने निघाले होते, त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. (हे वाचा-Maharashtra Lockdown Update: सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार किराणाची दुकानं) गेवराई गावाजवळ येताच समोरून जात असलेल्या हायवा ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पाठीमागून येणारी दोघांची रिक्षा ट्रकवर धडकली. या अपघातात रिक्षातील हबीब आणि अफरोज गंभीर जखमी झाले. दोघांना घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ सरकारी रुग्णालयात (घाटी) दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हबीब आणि अफरोज यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अरब गल्‍लीवर शोककळा कारोनाच्या बिकट काळातही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दोघे जीवावर उदार होऊन रिक्षा चालवायचे. कुटुंबाची सगळी जबाबदारी या दोघांवर होती. या घटनेने अरब गल्‍लीवर शोककळा पसरली. अगदी लहानपणापासून एकमेकांसोबत राहणाऱ्या या मित्रांचा जनाजादेखील एकाच वेळी मोहल्ल्यातून निघाल्याचे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. (हे वाचा-श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवे यांचं पुण्यात निधन) वडिलांशिवाय जेवायचा नाही मुलगा अफरोज याला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर इसाकला दोन वर्षांचा आणि साडेचार वर्षांचा मुलगा आहे. इसाक रोज रात्री काम आटोपल्यानंतर दोघांसाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचा. मोठा मुलगा आबुजर हा वडिलांशिवाय कधीही जेवत नसे. इसाक आल्यानंतर दोघे बापलेक सोबत जेवण करायचे, रविवारी देखील त्याने त्याच्या बाबांची खूप वेळ वाट पाहिली. मात्र, ते आलेच नाहीत त्यामुळे अखेर तो उपाशी पोटी झोपला, हे एकून अनेकांचे मन सुन्न झाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Road accidents

    पुढील बातम्या