कोरोनाच्या कहरात बीडमधील कुटुंबावर शोककळा; पोहोण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा दुर्देवी मृत्यू

कोरोनाच्या कहरात बीडमधील कुटुंबावर शोककळा; पोहोण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा दुर्देवी मृत्यू

धक्कादायक म्हणजे या तिघांचेही वय 17 ते 20 दरम्यान असल्याचे समोर आलं आहे.

  • Share this:

बीड, 16 एप्रिल : नाळवंडी रस्त्यावर असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. अथक परिश्रमानंतर पोलिसांना तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यश आलं आहे. बीड शहरातील गांधी नगर येथील मयूर राजू गायकवाड, ओंकार गणेश जाधव, शाम सुंदरलाल देशमुख आणि अन्य एक जण बीड-नाळवंडी रोडवरील नखातेच्या खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र यादरम्यान या तिघांचाही खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर या तिघांचेही वय 17 ते 20 दरम्यान असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस पुढीस तपास करत आहेत.

बीड शहराजवळील नाळवंडी रोडवर पांगरबावडी शिवारातील खदाणीत काही तरुण पोहोण्यासाठी गेले होते. हे सर्व बीड शहरातील गांधी नगर येथील रहिवाशी आहेत.  सायंकाळी 4 च्या सुमारास पोहण्यासाठी खदाणीत गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाइकांनी अक्षरशः हंबरडा फोडला आहे. गांधीनगर भागात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा-चाचणी न करता Covid निगेटिव्ह; गुजरातमध्ये महाराष्ट्रातील रॅकेटचा पर्दाफाश

बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे व गर्मी जास्त झाल्यामुळे काही जण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नदी तलाव शोधत असतात. असेच पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांच्या जीवावर बेतले. यात खदाण्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे असुरक्षित ठिकाणी पोहायला जाणं हे जीवावर बेतू शकतं ही बाब समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास सहा ते सात मुलं पोहोण्यासाठी गेली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 8:33 PM IST
Tags: beeddeath

ताज्या बातम्या