औरंगाबादेत ऑनरकिलिंग? घरातील वादानंतर विहिरीत आढळला मुलीचा देह, वडिलांनीच मृत ठरवून लेकीला परस्पर पुरलं

औरंगाबादेत ऑनरकिलिंग? घरातील वादानंतर विहिरीत आढळला मुलीचा देह, वडिलांनीच मृत ठरवून लेकीला परस्पर पुरलं

Crime in Aurangabad: औरंगाबाद येथील एका सतरा वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी परस्पर मृत ठरवून तिला पुरल्याची (declare death and buried her) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 23 सप्टेंबर: औरंगाबाद येथील एका सतरा वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी परस्पर मृत ठरवून तिला पुरल्याची (declare death and buried her by father) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे नातेवाईकांना घरात कोंडून वडिलांनी मुलीवर अंत्यसंस्कार उरकले आहेत. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली असून संबंधित घटना ऑनर किलींगचा (Honor Killing in Aurangabad) प्रकार असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संबंधित धक्कादायक घटना काल 22 सप्टेंबर रोजी औरंगाबादमधील दौलताबाद येथे घडली आहे. तर राधा जारवाल असं मृत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा सायंकाळी आपल्या घरात स्वयंपाक करत होती. दरम्यान तिचा आपल्या वडिलांसोबत कोणत्या तरी कराणावरून वाद झाला. या वादातून वडिलांनी तिला मारहाण केली. त्यामुळे राधा रागाच्या भरात घराबाहेर पडली. खूप वेळ होऊनही राधा परत घरी न आल्याने वडिलांनी तिची सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

हेही वाचा-पुणे: सायबर कॅफेत जाताना तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

अखेर शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला.  यानंतर वडिलांनी भाऊ आणि अन्य दोघांच्या मदतीने राधाचा देह विहिरीतून बाहेर काढला. या धक्कादायक प्रकारानंतर गावातील सर्व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर वडिलांनी राधाला परस्पर मृत घोषित करत कुटुंबीयांना एका खोलीत बंद केलं. त्यानंतर विहिरीशेजारी एक खड्डा खोदून पोटच्या लेकीला घाईघाईने पुरलं आहे. गावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता, संबंधित संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा-बलात्कार पीडित चिमुकलीचं धाडस; कोर्टात वाचला अत्याचाराचा पाढा, नराधमाला जन्मठेप

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संशयित आरोपीला तीन मुली आणि दोन मुलं असल्याची माहिती पोलिसांना कळाली. पण सर्वात मोठी मुलगी राधा कुठे आहे? हे विचारताच कुटुंबातील सगळेच जण शांत बसले. पण पोलिसी खाक्या दाखवताच वडिलांनी राधाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. यानंतर पोलिसांनी कुटुंबातील अन्य सदस्यांची देखील विचारपूस केली आहे. आज संबंधित मुलीचा मृतदेह बाहेर काढला जाणार असून शवविच्छेदनासाठी पाठवला जाणार आहे. त्यानंतर रहस्यमय मृत्यूमागचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे. पण संबंधित सर्व प्रकार ऑनर किलींगचा असू शकतो असा दाट संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Published by: News18 Desk
First published: September 23, 2021, 12:38 PM IST

ताज्या बातम्या