Home /News /aurangabad /

परिस्थितीपुढं कधीच नाही झुकला पण कोरोनानं हरवलं; उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा मृत्यू

परिस्थितीपुढं कधीच नाही झुकला पण कोरोनानं हरवलं; उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाचा मृत्यू

आपल्या आई वडिलांना (Sugarcane workers) उसतोड कामात मदत करत डॉक्टर (Dr. Rahul pawar death) होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या मुलाला अखेर कोरोनानं हिरावलं आहे.

    परभणी, 26 मे: आपल्या आई वडिलांना (Sugarcane workers) उसतोड कामात मदत करत डॉक्टर (Dr. Rahul pawar death) होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या मुलाला अखेर कोरोनानं हिरावलं आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली कोरोनासोबतच्या लढ्यात राहुलला अपयश आलं आहे. त्यानं आज सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. घरातील गरीब परिस्थितीपुढे कधीही हात न टेकलेल्या राहुलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. परभणीच्या पाथरी येथील आनंद नगर तांड्यावर राहणारा डॉक्टर राहुल पवार आपल्या आई वडिलांना उसतोड कामात मदत करायचा.  अलिकडेच त्यानं एमबीबीएसच्या तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती. दरम्यान त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. त्याला कोरोनासोबतचं म्युकरमायकोसिसचा संसर्गही झाला होता. मागील एक महिन्याहून अधिक कालावधीपासून तो औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होता. त्याची घरची परिस्थिती बिकट असल्यानं त्याच्या उपचारासाठी मित्रांनी आणि महाविद्यालयाने निधीही उपलब्ध करून दिला होता. पण त्याची कोरोनाशी लढाई अपयशी ठरली आहे. त्यानं आज उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. पिढ्यानं पिढ्या उसतोडीचं काम करणाऱ्या कुटुंबाला कष्टाच्या जोखडातून मुक्त करण्याची स्वप्न पाहाणाऱ्या राहुलचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील रहिवासी असणारा राहुल विश्वनाथ पवार लातूर येथील एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतं होता. त्याचवेळी तो आपल्या आई वडिलांना उसतोड कामात मदतही करत होता. हे वाचा -कोरोना रुग्णासोबत असताना...; कोरोना योद्धा डॉक्टरचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव एप्रिल महिन्यात राहुलची एमबीबीएस पदवीची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली. यावेळीचं त्याला कोरोनाची लक्षणं जाणवतं होती. पण परीक्षा नाही दिली, तर सहा महिने वाया जातीलं. या भीतीनं राहुलने आजारी असूनही परीक्षा दिली. दरम्यान कोरोनामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्या उपचाराचा सर्व खर्च महाविद्यालयानं उचलला पण त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Corona patient, Death, Parbhani

    पुढील बातम्या