Home /News /aurangabad /

SSC Exam: दहावीचं हॉलतिकीट देण्यासाठी संस्थाचालकाकडून 30 हजारांची लाच, औरंगाबादमध्ये दोघे एसीबीच्या जाळ्यात

SSC Exam: दहावीचं हॉलतिकीट देण्यासाठी संस्थाचालकाकडून 30 हजारांची लाच, औरंगाबादमध्ये दोघे एसीबीच्या जाळ्यात

SSC Exam: आजपासून राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे.

    औरंगाबाद, 15 मार्च : आजपासून राज्यात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला (SSC exams 2022) सुरुवात होत आहे. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी औरंगाबाद (Aurangabad)मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षेचं हॉलतिकीट (exam hall ticket) देण्यासाठी संस्थाचालकाने चक्क 30 हजार रुपयांची लाच मागितली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणी संस्थाचालकासह एका महिला लिपिकाला अटक करण्यात आली आहे. (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education class 10 exam) हॉल तिकीट आणि परीक्षेत मदतीसाठी लाच दहावीच्या परीक्षेचं हॉल तिकीट देण्यासाठी तसेच परीक्षेत मदत करण्याचं सांगत संस्थाचालकाने विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोड होऊन 10 हजार रुपये देण्याचं ठरलं. हे पैसे घेत असतानाच संस्थाचालक आणि महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिलं आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव संपत पराजी जवळकर असे आहे. तर महिला लिपिकाचे नाव सविता खामगावकर असे आहे. संपत पराजी जवळकर हे सातारा परिसरात असलेल्या पी. डी. जवळकर पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आहेत. वाचा : यंदाची 10वीची परीक्षा असणार खास; विद्यार्थ्यांना पेपरदरम्यान मिळणार या सुविधा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन यंदा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन (Offline Board exams) पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. वर्षभर ऑनलाईन क्लासेस केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,39,172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 8,89,584 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. तर 7,49,478 इतक्या विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यभरातून पाच हजारपेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. वाचा : 10वीच्या विद्यार्थ्यांनो, पेपरला जाताना 'या' IMP गोष्टी ठेवा लक्षात; होईल फायदा यंदा पेपरदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. 70 -100 मार्कच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटं अधिक देण्यात येणार आहेत. तर 40 - 60 मार्कांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिक देण्यात येणार आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली त्यामुळे ही सोय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रशपत्रिका लवकर समजावी आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आकलन करता यावं यासाठी उत्तरपत्रिका देण्याच्या 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, Board Exam, Crime, Ssc board

    पुढील बातम्या