औरंगाबाद, 20 फेब्रुवारी : औरंगाबाद (Aurangabad News) येथील वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात अत्यंत धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या 9 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते असं म्हणतात. मात्र या आईने प्रियकरासाठी आपल्या मुलाचीच हत्या केली. सार्थक रमेश बागूल (9) असं मृत मुलाचं नाव आहे. तर आईचं नाव संगीता रमेश बागूल (35) आणि तिच्या प्रियकराचं नाव साहेबराव माणिकराव पवार (52) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातील दरीत 17 फेब्रुवारी रोजी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला होता. दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी संगीता बागूल यांनी आपल्या मुलाच्या अपहरणाची नोंद केली होती. पोलिसांनी सापडलेल्या मृतदेहासोबतच्या कपड्यांवरुन संगीताने हा आपलाच मुलगा असल्याचं ओळखलं. मात्र खुनाचा आरोपी शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान होतं.
प्राथमिक तपासात हा खूप आईनेच केल्याचा संशय आला आणि त्यांनी आईला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने सत्य प्रकार सांगितला. मुलाने आपल्याला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. प्रेमात मुलाची अडचण नको म्हणून प्रियकराच्या मदतीने तिने मुलाचा खून केला.
हे ही वाचा-...म्हणून तरुणाची हत्या करून गुप्तांग जाळले; औरंगाबादमधील घटनेचा उलगडा
मुलाचा मृतदेह पाहूनही आईला आलं नाही रडू...
जेव्हा महिलेने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला तरीदेखील तिला रडू आलं नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. दुसरी बाब म्हणजे मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर अजिबातच दु:ख नव्हतं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.