Home /News /aurangabad /

Aaditya Thackeray : गर्दी झाली, बाबा रागावतील, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंचं मिश्किल उत्तर

Aaditya Thackeray : गर्दी झाली, बाबा रागावतील, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आदित्य ठाकरेंचं मिश्किल उत्तर

"सिल्लोडमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद होता. अनेक ठिकाणी स्वागत झालं. आनंद तर वाटला. अनेकजण भेटण्यासाठी उत्सुक होते. मलाही बरं वाटत होतं. कारण कोरोना संकटानंतर दीड वर्षांनी अशी गर्दी बघायला मिळतेय", असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    औरंगाबाद, 27 जानेवारी : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते सिल्लोड (Sillod) तालुक्यात आले तेव्हा त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या (social distancing) नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करुन आदित्य ठाकरे यांचं भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. या गर्दीबाबत आदित्य ठाकरे यांनीदेखील कबूल केले. "गर्दी जास्त होती. मात्र खूप दिवसांनंतर मी बाहेर पडलो. लोकांना बघून आनंद झाला. मात्र ही गर्दी बघून माझे वडील मुख्यमंत्री मला रागावतील. मी सर्व नियम अंमलात आणतो. त्यामुळे मला मुख्यमंत्री बोलले तर मी सरळ शिवेसेनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर ढकलून देईन", अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? "सिल्लोडमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद होता. अनेक ठिकाणी स्वागत झालं. आनंद तर वाटला. अनेकजण भेटण्यासाठी उत्सुक होते. मलाही बरं वाटत होतं. कारण कोरोना संकटानंतर दीड वर्षांनी अशी गर्दी बघायला मिळतेय. कदाचित गर्दी बघितल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन येऊ शकेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमांच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. नियम पाळलेच पाहिजेत, अशी त्यांची भूमिका असते. गर्दी थोडी टाळावी, असा त्यांचा उद्देश असतो. ते सत्यही आहे. कारण जिथे कोरोना वाढतोय तिथे गर्दी टाळली पाहिजे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. (बीडमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला 'पुष्पा', पोलिसांनी केला गुन्हा दाखल) "ही गोष्ट सत्य आहे की, कार्यकर्ते आणि लोकांना भेटून मलादेखील बरं वाटलं. मी जेव्हा फिरत असतो तेव्हा काळजी घेऊन फिरत असतो. पण आज चौकात जंगी स्वागत होत होतं त्याचं कारण मी अब्दुल सत्तार यांच्याकडे ढकलेल", अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. 'औरंगाबादमध्ये काम करावं लागेल' "औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक पावलावर इतिहास आहे. आपल्याला अजून चांगला विकास कसा करता येईल, तो जगासमोर चांगल्याप्रकारे कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न असेल. मला मंत्री म्हणून पाहण्याचं स्वभाग्य मिळालं. अभ्यासकांनी यावं. थोडं काम केलं तर स्थानिकांना नोकरी मिळू शकतो", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 'नितेश राणेंवर काय बोलायचं?' आदित्य ठाकरे यांना यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. "नितेश राणेंवर काय बोलायचं? आम्ही आमची राजकारणाची पातळी खाली घेऊन जाणार नाही. आम्ही आमचं काम करु, कामावर लक्ष देऊ आणि जनतेची सेवा करु", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (महाराष्ट्राच्या माजी मंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे ऊर्जामंत्र्यांबाबत तक्रार) आदित्य ठाकरेंकडून वेरुळ लेणीची पाहणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज औरंगाबादेत दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी वेरुळ लेणीची पाहणी केली. त्यानंतर ते अजिंठ्याला आले. सुरवातीला त्यांनी view point जाऊन अजिंठा लेणीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या अजिंठा लेणीची प्रतिकृतीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सायंकाळपर्यंत अजिंठा लेणीवर पाहणी केली. अजिंठा आणि वेरुळ लेणीवर काही विकासाच्या कामांची गरज आहे. त्याबद्दल लगेच निर्णय घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

    तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या