Home /News /aurangabad /

'...म्हणून बीड जिल्ह्याचा विकास रखडला'; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप

'...म्हणून बीड जिल्ह्याचा विकास रखडला'; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप

सरकारच्या घोषणेनंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया देत टीका केली आहे.

बीड, 13 ऑक्टोबर : बीड जिल्ह्यातील (Beed News) विकासासाठी इथले पालकमंत्री निधी देत नाहीत, आज जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समिती सर्कल असेल, या ठिकाणी प्रचंड विकास कामे रखडली आहेत. पालकमंत्री त्यांच्या देखील जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नाही. त्यामुळे या बीड जिल्ह्यातला विकास प्रचंड रखडला आहे. अशी टीका व आरोप पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केली (allegations were made by Pankaja Munde against Dhananjay Munde) आहे. तर जोपर्यंत लोकं म्हणतील, लोकं सावरगावघाट येथे येतील, तोपर्यंत त्या ठिकाणी मेळावा होणारचं, मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणारचं. असं देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याला बीड प्रशासनाने (Beed) परवानगी दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. (so the development of Beed district stalled Pankaja Mundes shocking allegations against Thackeray government ) सरकारने पॅकेज जाहीर केलं मी अतिशय आनंदाने त्याचं स्वागत करते; मात्र ते किती दिवसात मिळणार ? हे त्यांनी सांगावं असंही त्या यावेळी म्हणाल्या. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज नुकतच जाहीर केलं आहे. या सरकारच्या घोषणेनंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे ही वाचा-BJPच्या महिला नेत्याचं टोकाचं पाऊल; पती बाहेर झोपलेला असताना घडला गंभीर प्रकार त्या म्हणाल्या, की याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करेल, मात्र संपूर्णता नाही. दहा हजार कोटीचे पॅकेज सरकारने दिला आहे. मात्र ते पुरेसं नाही, दुसरी गोष्ट सरकारने हे पॅकेज जाहीर केल्यानंतर किती दिवसात मिळेल ? हे देखील जाहीर करावं. या त्यांच्या पॅकेजचं अत्यंत आनंदाने मी स्वागत करते. मात्र हे जर पैसे दिवाळीच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले, तर त्यांची दिवाळी गोड होईल. माझी विनंती आहे सरकारला हे तात्काळ करावं, आणि हे पॅकेज आणखी थोडं वाढवून द्यावं.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Beed news, BJP, Pankaja munde

पुढील बातम्या