Home /News /aurangabad /

भयंकर ! औरंगाबादेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मारेकऱ्यांनी गुप्तांगही जाळले

भयंकर ! औरंगाबादेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मारेकऱ्यांनी गुप्तांगही जाळले

औरंगाबादमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील मैदानात ही हत्या करण्यात आली आहे.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 21 जानेवारी : औरंगाबादमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (youth brutally killed in Aurangabad) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Aurangabad youth killed with stone later accused burnt his private part) औरंगाबादमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन 24 तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये दगडाने ठेचून हत्या या वर्षाच्या सुरुवातीलाच अंबरनाथमध्येही अशाच प्रकारे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अंबरनाथ येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. अंबरनाथ पश्चिम येथील डीमसी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली होती. रात्रीच्या सुमारास या तरुणाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. अंबरनाथमधील डीएमसी कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नाशिकमध्ये 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या नाशिकमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील दिपक जनार्दन जाधव या 22 वर्षीय युवकाची रात्रीच्या (20 डिसेंबर) सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, Crime

    पुढील बातम्या