हिंगोली, 25 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक (Shivsena) भलतेच संतापले. राज्यभरात याचे पडसाद पाहायला मिळाले. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. दिवसभरात राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. याच दरम्यान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी नारायण राणे यांना मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बांगर यांच्या धमकीमुळे (Threats) नवा वाद होण्याची शक्यता आहे.
आमदार बांगर यांनी संध्याकाळच्या सुमारास शिवसैनिकांना घेऊन नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा देखील काढली. यावेळी त्यांनी राणेंना खुलं आव्हानही दिलं.
राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो अशी थेट धमकी संतोष बांगर यांनी दिली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
भारतातला कोरोना कोणत्या Stage वर पोहोचला?, WHO नं केलं स्पष्ट
संतोष बांगर एवढ्यावरच बोलून थांबले नाहीत. एवढेच नाही तर पोलिसांना बाजूला करा, राणेंचा कोथळाच बाहेर काढतो असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सरकारनामानं दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान संतोष बांगर म्हणाले, या हरामखोर नारायण राणेंना मला संदेश द्यायचा आहे, तू काय सांगतो कुठे यायचं कुठे यायंच. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलिस प्रोटेक्शन जरा बाजूला कर, हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतींचा मावळा एकटा येऊन जर तुला चारीमुंड्याचीत नाही केलं, तुझा कोथळा जर बाहे नाही काढला, तर संतोष बांगर नावं सांगणार नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Shivsena