Home /News /aurangabad /

शिवसेना नेत्याची BJPच्या सरचिटणीस जबर मारहाण, गंभीर जखमी झालेल्या सरचिटणीसावर रुग्णालयात उपचार सुरु

शिवसेना नेत्याची BJPच्या सरचिटणीस जबर मारहाण, गंभीर जखमी झालेल्या सरचिटणीसावर रुग्णालयात उपचार सुरु

Aurangabad shivsena beat bjp General Secretary: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या (Shivsen) गुंडगिरीची घटना समोर आली आहे. यात भाजप (BJP) च्या सरचिटणीस जबर मारहाण झाल्याचं समजतंय.

औरंगाबाद, 26 जुलै: औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेच्या (Shivsena) गुंडगिरीची घटना समोर आली आहे. यात भाजप (BJP) च्या सरचिटणीस जबर मारहाण झाल्याचं समजतंय. यात भाजप सरचिटणीस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औरंगाबाद गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले. भुमरे यांच्या कार्यालयात काही शिवसेनेचे गुंड बोलावून केंद्रे यांना कार्यालयात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत केंद्रे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे भाजपकडून भास्कर जाधवांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’, Watch Video मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनीच गुंडगिरी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत असून औरंगाबादमध्ये ही याची प्रचिती पुन्हा दिसून आली. या मारहाणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. तसंच भाजप नेत्यांनी या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील केलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Aurangabad, BJP, Shiv sena

पुढील बातम्या