Home /News /aurangabad /

बाळासाहेबांच्या मार्गावर 'राज' पाऊल? मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? 'ही' आहेत दोन कारणं

बाळासाहेबांच्या मार्गावर 'राज' पाऊल? मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? 'ही' आहेत दोन कारणं

बाळासाहेबांच्या मार्गावर 'राज' पाऊल? मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? 'ही' आहेत दोन कारणं

बाळासाहेबांच्या मार्गावर 'राज' पाऊल? मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? 'ही' आहेत दोन कारणं

Raj Thackeray rally in Aurangabad: औरंगाबादमधील 1 मे रोजी होणारी सभा वादात सापडली आहे. कारण राज ठाकरे यांच्या औरंगाबादेत होणाऱ्या सभेला काही पक्ष संघटनांनी विरोध सुरू केला आहे.

औरंगाबाद, 22 एप्रिल : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्या मुंबई, ठाण्याच्या सभा प्रचंड गाजल्या. या सभांमुळे निपचित पडलेल्या मनसे कार्यकर्त्यांना नवचैतन्य निर्माण झालं, उत्साह मिळाला. मात्र राज ठाकरे यांच्या भाषणातील काही भूमिकांमुळे आता विरोधही व्हायला लागला आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथे 1 मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा (Raj Thackeray rally in Aurangabad) होणार आहे. मात्र ही सभा वादात सापडली आहे. कारण राज ठाकरे यांच्या औरंगाबादेत होणाऱ्या सभेला काही पक्ष संघटनांनी विरोध सुरू केला आहे. मुंबई, ठाण्यासारखी भाषण औरंगाबादमध्ये झाली तर आधीच संवेदनशील असलेल्या या शहरात तणाव वाढून दंगली पेटतील अशी भीती या संघटनांना वाटत आहे. औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या वरूनही वाद होण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा नियोजित आहे. औरंगाबाद पोलिसांनी मात्र मनसेला तोंडी विनंती केली आहे सभा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर न घेता गरवारे मैदानावर घ्यावी. मात्र मनसे आणि सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्यास ठाम आहे. वाचा : राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध,औरंगाबादेत 'राज'गर्जना होणार की नाही? सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सर्व सभा याच मैदानावर गाजल्या आहेत. म्हणून मनसेला ही राज ठाकरे यांची सभा याच मैदानावर हवी आहे. परवानगी तर फॉर्मलिटी आहे सभा तर नियोजित स्थळीच होणार असे ठाम आहे. शिवसेनेच्या प्रसाराचा इतिहास पहिला तर मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना थेट औरंगाबादमध्ये रुजली. सेनेच्या छोट्या शाखेची स्थापना 8 जून 1985 ला औरंगाबादमध्ये झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 मे 1988 च्या सभेनंतर औरंगाबादेत शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आणि सेनेला पहिल्या झटक्यात 12 आमदार पहिल्यांदाच मिळाले. वाचा : नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका मनसे मुंबई, ठाण्यानंतर पुणे, नाशिकसोडून औरंगाबादमध्ये सभा का घेत आहे? यामागे महत्त्वाची दोन कारण असतील. पुणे, नाशिक तसे जातीय राजकारणावर संवेदनशील शहर समजले जात नाहीत. त्यातुलनेत औरंगाबाद संवेदनशील आहे आणि दुसरे कारण औरंगाबाद हा सेनेचा गड आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा असेलच आणि त्याला औरंगाबादमध्ये प्रतिसाद मिळू शकतो. सेनेचा गड असलेल्या औरंगाबादला राजकीय भगदाड पाडता येऊ शकेल. राज ठाकरे यांच्या मनसेला मराठवाड्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने एकच आमदार 2009 साली मिळाला आणि 2011 मध्ये जिल्हा परिषद 8 सदस्य त्यानंतर मनसे निरांक राहिली. मराठवाड्यात घुसून सेनेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांची रणनीती स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच वाटते आहे. मुंबई, ठाणे नंतर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा भगवी शाल लपेटून घेऊन थेट औरंगाबादेत आले आणि त्यांना लोकांनी पसंत केले. आताही राज ठाकरे भगवी शाल लपेटून मुंबई, ठाण्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन औरंगाबादमध्ये येत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray, Shiv sena

पुढील बातम्या