Home /News /aurangabad /

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात मोठी बातमी

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात मोठी बातमी

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात मोठी बातमी

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात मोठी बातमी

Raj Thackeray Rally in Aurangabd: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

    औरंगाबाद, 28 एप्रिल : औरंगाबाद (Aurangabad)मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा (MNS Chief Raj Thackeray Rally) आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांची अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली. काल मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यानंतर आता या सभेच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांकडून अटी-शर्थींसह परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. सभेआधी पोलिसांकडून राज ठाकरेंना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. वाचा : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेला झटका, औरंगाबाद पोलिसांनी घेतला मोठा निर्णय काय असू शकतात अटी-शर्थी? ध्वनी प्रदूषण टाळण्याच्या संदर्भात नियम पाळावे लागतील लहान मुले, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तरतूद, उपाययोजना कुणाच्याही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार धर्म, प्रांत, वंश, जात या मुद्द्यांवर विधान करणं टाळावे कुठल्याही समुदायाचा किंवा व्यक्तीचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार सभेच्या ठिकाणी गैरवर्तन, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? औरंगाबाद (Aurangabad) येथे 1 मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा (Raj Thackeray rally in Aurangabad) होणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सर्व सभा याच मैदानावर गाजल्या आहेत. म्हणून मनसेला ही राज ठाकरे यांची सभा याच मैदानावर हवी आहे. परवानगी तर फॉर्मलिटी आहे सभा तर नियोजित स्थळीच होणार असे ठाम आहे. शिवसेनेच्या प्रसाराचा इतिहास पहिला तर मुंबई, ठाण्यानंतर शिवसेना थेट औरंगाबादमध्ये रुजली. सेनेच्या छोट्या शाखेची स्थापना 8 जून 1985 ला औरंगाबादमध्ये झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या 8 मे 1988 च्या सभेनंतर औरंगाबादेत शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आणि सेनेला पहिल्या झटक्यात 12 आमदार पहिल्यांदाच मिळाले. मनसे मुंबई, ठाण्यानंतर पुणे, नाशिकसोडून औरंगाबादमध्ये सभा का घेत आहे? यामागे महत्त्वाची दोन कारण असतील. पुणे, नाशिक तसे जातीय राजकारणावर संवेदनशील शहर समजले जात नाहीत. त्यातुलनेत औरंगाबाद संवेदनशील आहे आणि दुसरे कारण औरंगाबाद हा सेनेचा गड आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा असेलच आणि त्याला औरंगाबादमध्ये प्रतिसाद मिळू शकतो. सेनेचा गड असलेल्या औरंगाबादला राजकीय भगदाड पाडता येऊ शकेल. राज ठाकरे यांच्या मनसेला मराठवाड्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हर्षवर्धन जाधव यांच्या रूपाने एकच आमदार 2009 साली मिळाला आणि 2011 मध्ये जिल्हा परिषद 8 सदस्य त्यानंतर मनसे निरांक राहिली. मराठवाड्यात घुसून सेनेला धक्का देण्यासाठी राज ठाकरे यांची रणनीती स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच वाटते आहे. मुंबई, ठाणे नंतर बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा भगवी शाल लपेटून घेऊन थेट औरंगाबादेत आले आणि त्यांना लोकांनी पसंत केले. आताही राज ठाकरे भगवी शाल लपेटून मुंबई, ठाण्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन औरंगाबादमध्ये येत आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या