मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेला झटका, औरंगाबाद पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray Rally: राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेला झटका, औरंगाबाद पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray rally in Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Raj Thackeray rally in Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Raj Thackeray rally in Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

औरंगाबाद, 26 एप्रिल : 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा (Raj Thackeray rally in Aurangabad) होणार आहे. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांची परवानगी प्रतिक्षेत असतानाही मनसैनिकांकडून राज ठाकरेंची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी मनसेने टिझर सुद्धा रिलीज (MNS released Raj Thackeray rally teaser) केला आहे. पण आता या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही हे पहावं लागेल. औरंगाबाद शहरात 37 (1) (3) कलम लागू औरंगाबाद शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) आणि (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. काय आहेत पोलिसांचे आदेश? औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढलं असून त्यात म्हटलं आहे की, औरंगाबाद आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांतर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच इतर विषयांच्या संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सध्या राज्यात मनसे पक्षाच्या वतीने आगामी काळात मंदीर / मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याला विविध राजकीय पक्ष, संघटना यांचा विरोध असून त्यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण / ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालाने मराठा / ओबीसी समाजात असंतोष असून त्या अनुषंगाने विविध राजकीय संघटना, पक्षांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. वाचा : 1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ थडाडणार; 'राज' गर्जनेचा टिझर प्रदर्शित मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध सामाजिक, राजकीय पक्ष, संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकात चालू असलेल्या हिजाब मुद्द्यावरुन शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढी विरोधात शासनाविरुद्ध विविध राजकीय पक्ष / संघटनांक़डून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. वाचा : मुंबई, ठाण्यानंतर राज ठाकरेंनी का निवडलं औरंगाबाद? 'ही' आहेत दोन कारणं औरंगाबाद शहर हे संवेदनशील असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे जरुरी वाटते. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास कोणत्याही व्यक्तीस खाली नमूद गोष्टी करता येणार नाहीत. शस्त्रे, लोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा पेकावयाची साधने बाळगू नये, जमा करु नये किंवा तयार करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा करू नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनीक्षेपण करु नये.
First published:

Tags: Aurangabad, Raj Thackeray

पुढील बातम्या