Home /News /aurangabad /

गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात सुरू होती पूजा; भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून

गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात सुरू होती पूजा; भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून

50 वर्षीय हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यावर चाकूचे वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील (Beed News) शेपवाडीमध्ये उघडकीस आली आहे.

बीड, 2 एप्रिल : गुढीपाडव्याच्या सणादिवशीच माथेफिरू तरुणाने 50 वर्षीय हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यावर चाकूचे वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील (Beed News) शेपवाडीमध्ये उघडकीस आली आहे. संतोष दासोपंत पाठक असं खून झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून ऐन सणादिवशी घडलेल्या या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबेजोगाई तालुक्यातील शेपवाडी गावातील हनुमान मंदिराचे पुजारी संतोष पाठक आज गुढीपाडवा असल्याने सकाळपासून मंदिरात पूजा अभिषेक करण्यासाठी थांबले होते. दुपारी अचानक एका माथेफिरू तरुणाने चाकूने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या महिलांनी दगड मारुन पाठक यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत त्यांची सुटका केली. मात्र तोपर्यंत संतोष पाठक यांच्या अंगावर चाकूचे गंभीर वार झाले होते. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गावात घडलेल्या प्रकारामुळे काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुजाऱ्याचा खून का केला हे देखील अद्याप समोर आलेलं नाही. मात्र मारहाण करत असताना महिलांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो माथेफिरू तरुण पळ काढून निघून गेला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याने खून का केला ? याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घडलेल्या प्रकारामुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. हे ही वाचा-Aurangabad: मोबाइलवर व्हिडीओ शूट करत तरुणाची आत्महत्या, VIDEO सोशल मीडियात होतोय व्हायरल गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये खून दरोडे मारामारी, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. ते रोखण्यासाठी पोलीस दल अपयशी ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच दिवसाढवळ्या खून करण्यापर्यंत माथेफिरू जात असताना कायद्याचा धाक शिल्लक राहिला नाही, का असा प्रश्न देखील सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Aurangabad News, Beed news, Crime news, Murder

पुढील बातम्या