औरंगाबाद, 13 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे. एकीकडे खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) राज्याचा दौरा करत असून कोल्हापूरमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. तर त्यांच्यापाठोपाठ आता शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनीही 26 जून रोजी औरंगाबादेत मेळावा घेण्याची घोषणा केला आहे. तसंच, आमचे आंदोलन हे मूक नसून बोलके असणार आहे, असा टोलाही त्यांनी संभाजीराजेंना लगावला.
विनायक मेटे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार निष्क्रिय राहिला आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे समाजात संताप वाढत आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, मुळात हे फक्त फक्त नाटक होतं' अशी टीका मेटे यांनी केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात ज्योतिरादित्य सिंधियांना मिळणार 'हे' मंत्रिपद
'आता राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्यात नागरिकांचे मार्गदर्शन आणि संवाद करणार आहे. जिल्हाभर मेळावे घेतले जाणार आहेत. महसूल कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. आमचे आंदोलनं मूक नाही तर बोलके असणार आहेत, असं म्हणत विनायक मेटे यांनी खासदार संभाजीराजेंना टोला लगावला.
'औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचा पहिला मेळावा घेणार आहोत. 26 जून रोजी औरंगाबादमध्ये मोठा मेळावा होईल, शाहू महाराजांच्या स्मृती निमित्त हा मेळावा असणार आहे. तसंच 27 जून रोजी मुंबईमध्ये 10 हजार मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे', अशी माहितीही मेटेंनी दिली.
‘बघावं तेव्हा ही बाई गरोदरच असते’; नव्या फोटोशूटमुळं लिसा हेडन होतेय ट्रोल
'आरक्षणासाठी कायदेशीर तज्ञा समिती नेमणार आहे. या समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढा दिला जाणार आहे. रस्त्यावरही आम्ही लढणार आहे. जर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर येत्या 7 तारखेपासून सुरू होणार अधिवेशन चालू देणार नाही. सत्ताधारी मराठा आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली नाही. केंद्र सरकारने 3 दिवसात फेरविचार याचिका दाखल केली', असंही मेटे म्हणाले.
'माओवाद्यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर माओवाद्यांच्या जाळ्यात तरुण अडकू शकतात. त्यामुळे राज्याला याची किंमत चुकवावी लागू शकते', असा इशाराही मेटेंनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.